Shiv Sena on Congress, BJP: भाजपलाही जिंकण्यासाठी काँग्रेसचे टॉनिक लागते- शिवसेना
Shiv Sena,Congress | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पंजाबात काँग्रेस (Congress) फोडून भाजपास (BJP) विधानसभा गिळायची आहे, हा विनोदच म्हणावा लागेल. काँग्रेसशिवाय भाजपासही जिंकता येत नाही आणि भाजपास काँग्रेसचे टॉनिक लागते. पण के काँग्रेस नेतृत्वास कधी उमगणार? असा सवाल विचारत शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दैनिक सामना संपादकीयातून (Dainik Saamana Editorial) काँग्रेस आणि भाजप अशा दोघांवरही टोलेबाजी करण्यात आली आहे. 'काँग्रेसचे टॉनिक' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात शिवसेना मुखपत्राने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. तर, काँग्रेसलाही टोले लगावले आहेत.

काय म्हटले आहे सामना संपादकियात?

नरेंद्र मोदींच्या वादळापुढे भाजपाच्या विस्तारामुळे काँग्रेसची हालत पतली झाली आणि काँग्रेसच्या वाड्यातले उरले-सुरले वतनदार देखील सोडून चालले आहेत. पंजाबचा सुभा मुळापासू हादरला आहे. कॅप्टन अमरिंदर यांना काँग्रेस श्रेष्ठींनी पदावरून दूर केलं. प्रदेशाध्क्ष नवजोतसिंग सिद्धूंनी पेढे वाटत भागडा केला. पण या उठवळ, बेभरवशाच्या सिद्धू यांनीच आता पदाचा राजीनामा देऊन काँग्रेसपुढचं संकट वाढवलं. सिद्धूंच्या सततच्या कटकटीमुळे अमरिंदर यांना दूर केलं. आता सिद्धूही गेले काँग्रेसच्या हाती काय उरलं? (हेही वाचा, Shiv Sena on Maharashtra Governor: हत्तीच्या पायाखाली लोकशाही, तुमचीच धोतरे पेटतील; शिवसेनेची राज्यपालांवर जोरदार टीका)

भाजपाकडे मंत्रीपदं वाटण्याची क्षमता आहे म्हणून लोक त्यांच्याकडे जात आहेत. त्याला सूज येणं म्हणतात. अर्थात काँग्रेसची ही सूज जरा जास्तच उतरली आहे, त्यामुळे काँग्रेसचं काय होणार असा घोर लागलाय. काँग्रेस पक्ष आजारी आहे. त्यासाठी सुरू असलेले उपचार चुकीचे आहेत का याचा विचार व्हायला हवा. काँग्रेसनं उसळी मारून उठावं, मैदानात यावं अशी लोकभावना आहे पण त्यासाठी काँघ्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष हवा.

भाजपात जाण्याच्या शक्यतेला अमरिंदर सिंग यांनीच पूर्णविराम दिला आहे. पण आपण काँग्रेसमध्येही राहणार नाही, असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे ते स्वत:चा नवा पक्ष स्थापन करून काँग्रेसला खड्ड्यात टाकतील असं दिसत आहे”, असं अग्रलेखात म्हटलं आहे. तसेच, “अमरिंदर सिंग यांना केंद्रीय कृषीमंत्रीपदाची ऑफर मिळाल्याची बोंब उठली होती. 75 वर्ष पूर्ण झालेल्यांना सत्तेचं पद मिळत नाही असं मोदींचं धोरण आहे. अमरिंदर सिंग यांचं वय 79 आहे. त्यामुळे हे कसं होणार? असा सवालही शिवसेनेने विचारला आहे.