दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी चलनी नोटांवर लक्ष्मी आणि भगवान गणेशाचे फोटो लावण्याची मागणी केल्यानंतर, इतर अनेक नेत्यांनी आपापले पर्याय मांडायला सुरुवात केली आहे. आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एका नोटेची फोटोशॉप केलेली प्रतिमा शेअर केली आहे, ज्यावर महात्मा गांधींऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसत आहे. ही 200 रुपयांची नोट आहे, ज्याला कॅप्शन दिले आहे- ‘ये परफेक्ट है’.
राणेंशिवाय काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनीही चलनात असलेल्या नोटेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असायला हवा, अशी सूचना केली आहे. जागरणमधील वृत्तानुसार, काँग्रेस नेत्याने सांगितले की, आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे फोटो चलनी नोटेवर असले पाहिजेत. दोन्ही नेते अहिंसा आणि लोकशाहीचे प्रतीक आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
Ye perfect hai ! 😊 pic.twitter.com/GH6EMkYeSN
— nitesh rane (@NiteshNRane) October 26, 2022
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणेश यांचे फोटो लावण्याची मागणी केली आहे. बुधवारी सकाळी केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन नोटांवर हिंदू देवतांची छायाचित्रे छापण्याची मागणी केली. पत्रकारांशी संवाद साधताना केजरीवाल म्हणाले की, ‘मी असे म्हणत नाही की सर्व नोटा बदलल्या पाहिजेत, पण ज्या काही नव्या नोटा छापल्या जातील त्यावर ही सुरुवात झाली पाहिजे.’ अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधानांकडे ही मागणी केली आहे. (हेही वाचा: Sharad Pawar यांना भेटण्यासाठी तब्बल 400 किलोमीटरहून पायी प्रवास करून कार्यकर्ता बारामतीमध्ये दाखल (Watch Video))
यावर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य एक नाटक असल्याचे म्हटले आहे. ज्या मंत्र्याने देवी-देवतांची खिल्ली उडवली, आज तो हिंदू बनू पाहत असल्याचे ते म्हणाले.