Kirit Somaiya | (File Photo)

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे कोल्हापूर (Kohlapur) जिल्ह्यात जाणार होते. मात्र, कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आणि सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हा बंदी आदेश काढले. त्यानंतर पोलिसांनी सोमय्या यांना कराड रेल्वे स्थानकावर उतरवले. कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी केलेल्या विनंतीनंतर किरीट सोमय्या हे कराडमध्ये उतरले आता ते 9.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते काय माहिती देतात याबाबत उत्सुकता आहे.

किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्सप्रेस मधून कोल्हापूरला निघाले होते. दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी विनंती करताच किरीट सोमय्या हे कराड स्टेशवर उतरले. किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना या वेळी सांगितले की, पोलिसांच्या विनंतीस मन देऊन मी खाली उतरत आहे. पोलीस माझे शत्रू नाहीत. (हेही वाचा, Kirit Somaiya's Kolhapur Tour: किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा कसा असणार? येथे मिळवा संपूर्ण माहिती)

ट्विट

दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हाबंदी असल्याचे आदेश दाखवले. त्यानंतर किरीट सोमय्या कराड स्थानकावर उतरले. त्यानंतर आता किरीट सोमय्या हे सकाळी 9.30 ते 10 च्या सुमारास पत्रकार परिषद घेणार आहेत. दुसऱ्या बाजूला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे देखील पत्रकार परिषद घेणार असल्याचे समजते. त्यामुळे या पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ हे आपल्यावरील आरोपांना उत्तर देणार का? याबाबत उत्सुकता आहे.