Kirit Somaiya's Kolhapur Tour: किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा कसा असणार? येथे मिळवा संपूर्ण माहिती
Kirit Somaiya | (Photo Credits: Facebook)

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना कोल्हापूर जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून मज्जाव करण्यात आला होता. दरम्यान, किरीट सोमय्या यांना रितसर नोटीस देण्यात आली होती. मात्र, आपण कोल्हापूर दौरा (Kolhapur Tour) पूर्ण करणार असल्याच्या निर्णयावर किरीट सोमय्या ठाम होते. ज्यावेळी किरीट सोमय्या सीएसएमटी स्थानकावर पोहचले, तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मला अडून नका अशी विनंती किरीट सोमय्या यांनी पोलिसांना केली. त्यानंतर किरीट सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला रवाना झाले आहेत. किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

किरीट सोमय्या उद्या म्हणजेच 20 सप्टेंबर रोजी कोल्हापूरात दाखल होणार आहेत. किरीट सोमय्या हे पहिल्यांदा महाविकास आघाडीतील मंत्री हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्याची पाहणी करणार आहेत. तसेच या कारखान्याची सर्व माहिती जाणून घेणार आहेत. त्यानंतर 27 सप्टबरे रोजी आलीबाग येथील रश्मी ठाकरे यांच्या अलीबागच्या गोलाई येथील बंगल्याची पाहणी करणार आहेत. याचबरोबर 30 सप्टेंबर रोजी अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्यालाही भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व ठिकाणी आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. हे देखील वाचा- Kirit Somaiya मुंबईत स्थानबद्ध तर, कोल्हापुरात नो एन्ट्री; Devendra Fadnavis यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया

ट्वीट-

दरम्यान, किरीट सोमय्या यांच्यावरील स्थानबद्ध कारवाईनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांची प्रतिक्रिया दिली होती. माजी खा. किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकारविरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही फडणवीस यांनी दिला होता.