Devendra Fadnavis (Photo Credit: Twitter)

कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. ज्यामध्ये तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये असे सोमय्यांना सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्या याच्या घराबाहेर मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. किरीट सोमय्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात केलेल्या घोटाळ्याच्या आरोपाचा पाठपुरावा करण्यासाठी कोल्हापूरात जाणार होते. परंतु, मुश्रीफ यांचे समर्थक संतापले असल्यामुळे सोमय्या यांना कोल्हापूरात जाण्यापासून रोखले जात आहे. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांच्यावरील स्थानबद्ध कारवाईनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. माजी खा. किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकारविरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे. हे देखील वाचा- Ashish Shelar Criticizes Sanjay Raut: महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष टिकणार, हे वारंवार बोलावे का लागते? आशिष शेलार यांचा संजय राऊत यांना सवाल

देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट-

किरीट सोमय्या यांना कोल्हापूर प्रवेशबंदीची नोटीस आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात थिणगी पडली आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. भाजप नेत्यांच्या प्रतिक्रियेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनीही टिटरच्या माध्यमातून भाजपवर पलटवार केला आहे.