Ashish Shelar Criticizes Sanjay Raut: महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष टिकणार, हे वारंवार बोलावे का लागते? आशिष शेलार यांचा संजय राऊत यांना सवाल
Ashish Shelar, Sanjay Raut (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारची (Maha Vikas Aghadi) स्थापना केली आहे. यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असे भाकीत विरोधकांकडून केले जात आहे. तर, महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास सत्ताधाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. याचपार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. सरकार 5 वर्षे टिकणार हे तुम्हाला बोलावे का लागते? असा सवाल शेलार यांनी विचारला आहे.

आशिष शेलार यांनी असे म्हटले आहे की, "जो व्यक्ती आपले पाप लपवण्याचा प्रयत्न करतो. तसेच पापावर पांघरून घालण्यासाठी दिखावपणे का होईना बोलावे लागते. संजय राऊतदेखील तेच करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मत मिळवायची आणि जिंकल्यानंतर दुसरीकडे पळायचे. तसेच जर तुमचे सरकार 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे, मग तुम्हाला हे सातत्याने का सांगावे लागते?" असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. याशिवाय, "सरकार पाच वर्षे टिकणार हे सांगणे म्हणजे आपला दुबळेपणा लपवण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही दुबळे आहात, त्यापासून पळण्याचा प्रयत्न म्हणजेच राऊतांचे वक्तव्य आहे," अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. हे देखील वाचा- COVID 19 Vaccine साठी सार्‍या लाभार्थ्यांनी शक्य तितक्या लवकर लसीकरण पूर्ण करावं - बीएमसी आयुक्त I S Chahal यांचं मुंबईकरांना आवाहन

दरम्यान, "हे सरकार पूर्णपणे पाच वर्षे चालणार. शिवसेना शब्दाची पक्की आहे. शिवसेना कधी विश्वासघात करत नाही. शिवसेना पाठीत खंबीर खुपसत नाही. शिवसेना दिलेला शब्द मोडत नाही, त्यामुळे हे सरकार पडेल. नवीन गठबंधन होईल या भ्रमात कुणीही राहू नये. कुणाला पतंग उडवत बसायचे असेल तर, त्यांनी उडवावी तो पतंग कधी कापायचा? हे आम्हाला माहिती आहे, असे संजय राऊत यांनी शिवसेना- भाजप युतीच्या चर्चेवर भाष्य केले होते.