पीओपीच्या गणेशमूर्तींवरील बंदी तुर्तास शिथिल करा; भाजप नेते आशिष शेलार यांची केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे मागणी
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (Central Pollution Control Board) प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (Plaster of Paris) मूर्ती आणि त्यांच्या उंचीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच मूर्तीची घडण आणि विसर्जन याबाबतही उत्सव समित्यांना आणि मूर्तीकारांना सूचना करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (Central Pollution Control Board) प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (Plaster of Paris) मूर्ती आणि त्यांच्या उंचीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच मूर्तीची घडण आणि विसर्जन याबाबतही उत्सव समित्यांना आणि मूर्तीकारांना सूचना करण्यात आल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींऐवजी शाडू मातीच्या गणेश मूर्तीचा आग्रह धरणे निसर्गाच्या दृष्टीने कधीही योग्य आहे. मात्र, यावेळी आलेले करोनाचे संकट, त्यामुळे मुर्तीकारांना मिळालेला अपुरा वेळ व अडचणीत आलेली अर्थव्यवस्था या सगळ्याचा विचार करता केवळ या वर्षासाठी पीओपीच्या मूर्तींवर घातलेली बंदी शिथिल करावी, अशी मागणी भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्रात गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पेण हे गणपतीचे गाव म्हणून ओळखले जाते. पेण येथील हमरापूर, कळवे, दादर यासारंखी अनेक छोट्या गावात गणपतींच्या मूर्ती तयार केल्या जातात. परंतु, कमी किमतीत आणि वजनाला हलके असल्याने मूर्ती घडवण्यासाठी पीओपीचा सर्रास वापर केला जातो. मात्र, पीओपीचा वापर केल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होत असून जल प्रदूषणाचे प्रमाणात वाढ होण्याची अधिक शक्यता आहे. यामुळे केंद्रीय प्रदुषण मंडळाने पीओपीपासून तयार केलेले मूर्तींवर निर्बंध लावले आहेत. दरम्यान, आशिष शेलार यांनी जावडेकर यांना एक पत्र लिहले आहे. वर्षभर हे कारखाने मूर्ती तयार करण्याचे काम करतात आणि या परिसरातून सुमारे 50 लाख मूर्ती कोकणासह महाराष्ट्राच्या विविध भागात जातात. त्यावर महाराष्ट्रातील अन्य छोटे मुर्तीकार अवलंबून आहेत. त्यामुळे ही एक साखळी असून या परिसरातून अमेरिका, अँब्राँडसारख्या देशापर्यंत निर्यात होतात. असे हे एक उद्योगक्षेत्र असून ते पूर्णपणे अडचणीत आले आहेत. या वर्षासाठी पीओपीच्या मूर्तींवर घातलेली बंदी शिथिल करावी, अशी विनंती आशिष शेलार यांनी या पत्रात केली आहे. हे देखील वाचा- राज्यांतर्गत रस्ते वाहतूक, विमान व रेल्वे सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा; शरद पवार यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
आशिष शेलार यांचे ट्वीट-
कोरोनाशी युद्ध सुरु असतानाच न्यायालयाच्या निर्देशानुसार प्लॅस्टर आँफ पॅरिसच्या गणेशमूर्तीवर घातलेली बंदी यावर्षीपुरती शिथिल करा, अन्यथा मुर्तीकारांचे नुकसान होईल, मुर्ती उपलब्ध होणार नाहीत, याकडे मी केंद्रीय पर्यावरण मंत्री @PrakashJavdekar यांचे लक्ष वेधलेय. pic.twitter.com/XlpVdINn2I
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 19, 2020
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. याचा फटका सर्वांनाच बसला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रसह संपूर्ण देशात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहेत. कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव पाहता देशात लॉकडाउन कायम ठेवण्यात आला आहे. लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 19, 2020 06:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

