Coronavirus: सध्या संपूर्ण देशात कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) घोषित करण्यात आले आहे. 21 दिवसांच्या लॉकडाऊन काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये, यासाठी बिगबास्केटने होम डिलिव्हरीची (Bigbasket Home Delivery) सुविधा सुरू केली असून मुंबई महानगरपालिका (BMC) आणि पोलिसांनी (Mumbai Police) केलेल्या सहकार्याबद्दल आभारही व्यक्त केले आहेत.
बिगबास्केटच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून जीवनावश्यक वस्तूंची डिलिव्हरी सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईकरांनी घरातचं थांबावे, असं आवाहनही बिगबास्केटने केलं आहे. (हेही वाचा - राज्यातील शिवभोजन केंद्र 3 तास सुरू राहणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)
बिगबास्केटने केलेलं ट्विट मुंबई महानगरपालिकेने रिट्विट केलं आहे. यात BMC ने मुंबईकरांना जीवनावश्यक वस्तूंची सुरक्षित खरेदी करावी. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन सेवांचा वापर करावा आणि घराबाहेर पडू नये, असं आवाहनदेखील महानगरपालिकेने नागरिकांना केलं आहे.
#StrongerTogether#StayHomeStaySafe
Taking orders for a safer Mumbai!
Thank you @bigbasket_com for ensuring that essential are delivered.
We urge Mumbaikars, especially senior citizens, to use online services, stay home & stay safe #AnythingForMumbai#NaToCorona https://t.co/zRFKLP9q0C
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 28, 2020
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 159 इतकी झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 834 इतकी झाली आहे. आतापर्यंत 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.