मुंबई (BMC) शहरात कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची संख्या (Mumbai COVID Cases Today) पुन्हा एकदा वाढू लागली आहे. ताज्या आकडेवारीनुसार पाठीमागील 24 तासात मुंबई महापालिकेत (Brihanmumbai Municipal Corporation) 20971 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत हा आकडा 800 नी वाढला आहे. मुंबई महापालिकेने (BMC) ही आकडेवारी आज (7 जानेवरी) जाहीर केली आहे. काल (6 जानेवारी) मुंबईतील कोरोना संक्रमितांची संख्या 20181 इतकी होती. तर मृतांची संख्याही 6 होती. आजही कोरोना रुग्णांमध्ये पाठीमागील 24 तासात मृतांची संख्या सहा इतकीच आहे. 1395 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील 88 जणांना ऑक्सिजन लावण्याची आवश्यकता भासली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात काल 36,000 कोरो रुग्ण आढळले होते.
मुंबईतील अत्यंत दाटीवाटीचा परिसर असलेल्या धारावी परिसरातही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. आज (शुक्रवार- 7 जानेवारी) या परिसरात कोरोनाचे 170 रुग्ण आढळले आहेत. दाटीवाटीचा परिसर असल्याने धारावीमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची सख्या 8.34 पेक्षा अधिक झाली आहे. शुक्रवारी जे कोरोना रुग्ण आढळले आहेत त्यामध्ये 84% रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे जाणवत नव्हती. 20,971 रुग्णांमध्ये केवळ 1395 जणांनाच रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासली आहे. मुंबईतील रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 6531 इतकी आहे. (हेही वाचा, Guidelines For Private Hospital: मुंबईतील खासगी रुग्णालयासाठी BMC कडून गाइडलाइन्स जाहीर)
मुंबईत आज दिवसभरात केवळ 88 रुग्णांना ऑक्जिजनची आवश्यकता भासली आहे. तर 2385 कोरोना रुग्ण अद्यापही ऑक्सीजनवर आहेत. आतापर्यंत 6531 रुग्ण प्रत्यक्ष बेडवर आहेत. एकूण बेडचा विचार करायचा तर 35,645 उपलब्ध आहेत. जे 18% इतके आहेत. पाठिमागील 24 तासांमध्ये कोरोना संक्रमित असलेले 8490 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. कोरोमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 16,394 पर्यंत पोहोचली आहे. सध्यास्थितीत मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या 91,731 इतकी आहे.
ट्विट
COVID-19 | Mumbai reports 20,971 new cases, 6 deaths and 8,490 recoveries today. Active cases 91,731 pic.twitter.com/ZpBJKFum9m
— ANI (@ANI) January 7, 2022
दरम्यान, कोरोना व्हायरस संसर्ग वाढताना दिसतो आहे. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावा लागणार का? असा प्रश्न विचारला जातो आहे. मात्र, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी मात्र लॉकडाऊन लावण्यासारखी स्थिती अद्यापतरी आली नसल्याचे म्हटले आहे.