Bhendi Bazaar Building Collapse | (Photo Credit - X)

मुंबई येथील भेंडी बाजार (Bhendi Bazaar Building Collapse) परिसतील 40 तानपुडा रस्त्यालगत असलेल्या खोजा जमातखाना जवळील हुसेनबाई इमारतीचा काही भाग कोसळला आहे. ही घटना शुक्रवारी (13 डिसेंबर) पहाटे घडली. मुंबई अग्निशमन दलाने (Mumbai Fire Brigade) पुष्टी केली की ही घटना 12:06 च्या सुमारास घडली. त्यानंतर तातडीने मदत आणि बचाव कार्य राबविण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, तळमजला आणि चार मजली परंतू रिकामी असलेली हुसैनीबाई इमारत पूर्णपणे कोसळली. ज्यामुळे संपूर्ण परिसरात मातीचा ढिगारा आणि धूळ पसरली. मुंबई अग्निशमन दल आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी तात्काळ केलेल्या कारवाईमुळे कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही. कारण धोकादायक स्थितीत असल्याने ही, इमारत आधीच रिकामी करण्यात आली होती.

मुंबई अग्निशमन दलाकडून तत्काळ कार्यवाही

इमारत कोसळल्याची घटना घडताच पोलिस आणि मुंबई अग्निशमन दल  जवानांनी घटनास्थळी तत्काळ हजेरी लावली. इमारत कोसळलेल्या ठिकाणी निर्माण झालेला आणि स्थानिक वाहतूकीस अडथळा ठरणारा मातीचा ढिगारा हटविण्यास तातडीने प्राधान्य देण्यात आले. शिवाय, स्थानिक नागरिकांनाही इमारत कोसळलेल्या रस्ता अथवा परिसराचा वापर टाळण्याचे अवाहन करण्यात आले. घटना मध्यरात्री घडल्याने नागरिकांनाही सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान, परिसरातील रहिवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी शोध आणि बचाव कार्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. (हेही वाचा, Bhiwandi Building collapsed: भिंवडीत दोन मजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर अवस्थेत)

मुंबई अग्निशमन दलाकडून मदत आणि बचाव कार्य

जुन्या इमारतींची तपासणी व्हावी: नागरिकांची मागणी

भेंडी बाजार या मुंबईतील दाट लोकवस्तीच्या भागात अनेक जुन्या इमारती आहेत ज्यांची अशा घटना रोखण्यासाठी नियमित देखभाल आणि तपासणी आवश्यक आहे, अशी भावना नागरिक व्यक्त करतात. दरम्यान, 27 नोव्हेंबर रोजी डोंगरी येथील गर्दीच्या निशानपाडा भागातील अन्सारी हाइट्स या 22 मजली निवासी इमारतीला लागलेल्या भीषण आगीनंतर काही दिवसांनी हुसेनबाई इमारत कोसळली आहे. त्यामुळे इमारत कोसळणे आणि इमारतींना आगी लागणे यांबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

इमरत कोसळतानाचे थरारक दृश्य सीसीटीव्ही कैद

मुंबईकर नागरिक सांगतात की, शहरामध्ये अनेक जुन्या आणि जीर्ण इमारती आहेत. या इमारती दाट लोकवस्तीच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे या इमारतींची सुरक्षा नियम आणि नियमित तपासणीची तातडीची गरज इमारती कोसळण्याच्या आणि आगीच्या उद्रेकाच्या वाढत्या वारंवारतेमुळे, अधिकाऱ्यांनी जीव आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी सक्रिय उपाययोजनांना प्राधान्य दिले पाहिजे, असेही हे नागरिक सांगतात.