Beed: शेतकऱ्याचा नादच खुळा; एक एकरात खोदली 212 फूट रुंद, 42 फूट खोल विहीर, संपवला दुष्काळ
Water| Representational Image | (Photo Credits: Wikimedia Commons)

महाराष्ट्रातील अनेक जिल्हे भयावह दुष्काळाचा नेहमीच सामना करताना दिसतात. सातत्याने पडत असलेला दुष्काळ (Drought) पाहून शेती कशी करायची हा प्रश्न शेतकऱ्यासमोर (Farmer) नेहमीच उभा राहिलेला असतो. बीड (Beed) जिल्ह्यातील मारुती बजगुडे नामक एका शेतकऱ्याने एक नामी शक्कल लढवत दुष्काळावर मात करण्याचा उपाय शोधला आहे. हा शेतकरी गेवराई (Gevrai) तालुक्यातील पाडळशिंगी (Padalshingi) गावचा रहिवासी आहे. या शेतकऱ्याने चक्क एक एकर इतक्या जागेवर महाकाय विहीर खोदली आहे. होय, महाकाय विहीर. या विहिरीचा व्यास 212 फूट असून खोली 42 फूट इतकी आहे. ही विहीर सध्या पंचक्रोशीत आकर्षण, पर्यटन आणि चर्चेचा विषय ठरली आहे. तर ही विहीर खोदणारा शेतकरी कौतुकाच विषय ठरला आहे.

विरीर पाहून अनेकांना हा एक तलावच असल्याचा भास होतो आहे. विहीर पाहण्यासाठी परिसरातील शेतकरीर रस्ता ओलांडून, खास वाट वाकडी करुन येतात. या विहीरीबाबत विचारले असता शेतकरी मारुती बजगुडे सांगतात या विरीरीसाठी आपल्याला प्रचंड खर्च आला. पण या खर्चावर मी एक नामी उपाय शोधला. ही विहीर खोदताना आत निघणारा मुरुम, दगड, खडक हे सर्व आम्ही आरबीआय या रस्ते बनविणाऱ्या कंपनीला विकले. ही कंपनी तेव्हा समृद्धी महामार्ग बांधते. त्यामुळे यातून बजगुडे यांना चांगला आर्थिक फायदाही झाला. (हेही वाचा, नांदेड मध्ये लॉकडाउनचा सदुपयोग करत बापलेकाने विहीर खोदली,गावच्या पाण्याची चिंता मिटवली, वाचा या जोडीची अनोखी कहाणी)

मारुती बजगुडे यांनी यांना एकूण 12 एकर शेती आहे. मात्र, सातत्याने पडत असलेल्या दुष्काळामुळे बजगुडे यांच्या हातात मात्र काहीच लागत नव्हते. त्यामुळे त्यांनी मंडप डेकोरेटर्स हा जोडधंदा सुरु केला. दरम्यान, त्यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी विहीर खोदण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि ते पूर्णत्वासही नेले.