
राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अनिल भोसले आणि त्यांच्या पत्नी यांच्या विरोधात बँक घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांसह अन्य 16 जणांनी मिळून शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत घोटाळा केल्याचा प्रकार समोर आला आहे. अनिल भोसले यांनी बँकेचे व्यवस्थापिक संचालक असून त्यांनी बँकेतील पैसे स्वत:साठी वापरले असल्याचे सत्य समोर आले आहे. ही रक्कम जवळजवळ कोटीच्या घरात असून बँकेला 71 कोटी 78 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
बँकेत ग्राहकांनी त्यांचे गुंतवलेले पैसे अनिल भोसले यांनी खोट्या सह्या करत वापरले असल्याचे आरबीआयच्या लेखापरिक्षणातून समोर आले आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. बँकेचे संचालक मंडळ गेल्या काही कालावधीपूर्वीच बंद पाडण्यात आले. त्यानंतर आता आरबीआयकडून बँकेचे कामकाज करण्यासाठी प्रशासकाची नेमणूक केली आहे. या बँकेत जवळजवळ तीनशे कोटी रुपये अडकले गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
यापूर्वी पुणे येथे चंदगड अर्बन निधी बँकेकडून ग्राहकांची फसवणूक करण्यात आली होती. त्यावेळी गरजू ग्राहकांना 7 कोटी रुपयांचा गंडा बँकेकडून घालण्यात आला होता. या प्रकारावर नागरिकांची प्रचंड संपात व्यक्त करत बँकेच्या ऑफिसची तोडफोड केली होती. तर बँकेच्या संचालकांनी हे प्रकरण दाबण्यात आल्याचा आरोप ग्राहकांनी केला.
तर पीएनबी बँक घोटाळाप्रकरणी नीरव मोदी आणि त्याचा साथीदार मेहुल चोक्सी याने काही बँक कर्मचाऱ्यांच्या मदतीने 13,500 कोटी रुपयांचा पीएनबी बँकेत घोटाळा केला. त्यानंतर सीबीआय आणि इडी या प्रकरणी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांचा तपास करत आहेत.आयकर विभागाने फेब्रुवारी 2018 पूर्वीच आयकर खात्याने नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याबाबत एक अहवाला तयार केला होता. हा अहवाल तब्बल 10 हजार पानांचा होता. मात्र, आयकर विभागाने त्यांच्याकडे असलेली ही महत्त्वपूर्ण माहिती प्रादेशिक आर्थिक गुप्तचर परिषदेलाही कळवली नाही. अखेर हा घोटाळा होण्यापूर्वी काही काळ आगोदर नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी भारताबाहेर पळाले. मोदी आणि चोक्सी ही जोडगोळी जानेवारी 2018च्या जानेवारीमध्ये भारताबाहेर पळाली.