देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालल्याने सरकारने लॉकडाउनचे आदेश काही दिवस वाढवले आहेत. त्यामुळे फक्त अत्यावश्यक सेवासुविध सुरु राहणार असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र रेल्वे सेवा ही पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली होती. तरीही 14 एप्रिल रोजी वांद्रे (Bandra) स्थानकात मोठ्या प्रमाणात विविध समुदायितील नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून आली. त्यामुळे एकाच वेळी अचाक एवढ्या मोठ्या संख्येने गर्दी कशी झाली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. तसेच गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार सुद्धा करण्यात आला. या प्रकरणातील आता 10 जणांना 21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
विनय दुबे याने सोशल मीडियात विनय दुबे याने एक व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट करुन कामगार वर्गाला भडकवल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली. तसेच त्याला वांद्रे कोर्टात हजर केले असता त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाती आणखी 10 जणांना सुद्धा येत्या 21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. परंतु पोलीस कोठडीची शिक्षा त्यांना 19 एप्रिल पर्यंत सुनावण्यात आली होती. मात्र त्यात आता वाढ केली असून त्यांना आज कोर्टात सादर करण्यात आले होते. (Fact Check: वांद्रे स्थानकातील मजूरांच्या गर्दीला जबाबदार असणारा विनय दुबे मुसलमान? त्याचा धर्मावरुन सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट मागील सत्य काय?)
Mumbai: 10 accused who were involved in the incident of gathering in Bandra on April 14, have been sent to further Police custody till 21st April. They were produced before a Bandra court today after their Police custody ended.
— ANI (@ANI) April 19, 2020
दरम्यान, वांद्रे स्थानकातील गर्दी प्रकरणी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. तसेच विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका ही करण्यात आली होती. या प्रकरणी संताप ही सोशल मीडियात व्यक्त करण्यात आला होता. तर पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास केला जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.