Migrant Workers Come Out on Road in Bandra (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर वांद्रे रेल्वेस्थानकात मंगळवारी बहुसंख्येने गर्दी उसळून आल्याचे दिसून आले. या प्रकरणातील आरोपी विनय दुबे याला अटक करण्यात आली आहे. तसेच एका वृत्तवाहिनेचा पत्रकार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता त्याला अटक करण्यात आली आहे. पत्रकाराने वांद्रे स्थानकात लॉकडाउनच्या काळात मोठ्या संख्येने गर्दी होण्याचे कारण ठरल्याटचा ठपका ठेवत त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता या पत्रकाराला उद्या (16 एप्रिल) कोर्टात हजर केले जाणार आहे. वांद्रे स्थानकात मंगळवारी अचानक मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. याच कारणावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर टीका सुद्धा केली.

मुंबई पोलिसातील डीसीपी अभिषेक त्रिमुखी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल कुलकर्णी या वृत्तवाहिनीच्या पत्रकारने रेल्वेसेवा सुरु झाल्याबाबत चुकीची माहिती दिली असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्याला आता उद्या कोर्टा हजर केले जाणार आहे. त्याचसोबत लॉकडाउनच्या काळात वांद्रे स्थानकाबाहेर गर्दी केल्याच्या प्रकरणी 3 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणी अधिक व्हिडिओ आणि माहितीचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.(Bandra Incident: वांद्रे स्थानकातील गर्दीचे प्रकरण आरोपी विनय दुबे याला भोवले, 21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी) 

दरम्यान, विनय दुबे याने एक व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट करुन कामगार वर्गाला भडकवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे विनयच्या विरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. साथिचा रोग पसरवण्यासाठी लोकांना एकत्र केल्याचा आरोप ही विनय याच्यावर लावण्यात आला आहे. वांद्रे येथील घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले असून या प्रकरणी नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.