कोरोनाची महाराष्ट्रासह देशभरातील स्थिती पाहता अत्यंत गंभीर आहे. त्यामुळेच सरकारने लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. मात्र मंगळवारी याच लॉकडाउनच्या आदेशाचे उल्लंघन केल्याची घटना वांद्रे पश्चिम परिसरात घडल्याचे दिसून आले. त्यावेळी बहुसंख्येने विविध समुदायातिल नागरिकांची वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी दिसून आली. या प्रकरणी आरोपी विनय दुबे याने सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात कामगार वर्गाला एकत्र येत रेल्वेसेवा 14 तारखेनंतर सुरु न झाल्यास आपण स्वत: कामगारांसोबत विविध राज्यात पायी चालत जाण्याचे विधान केले. त्याचसोबत कामगारांना एकत्र येण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप सुद्धा विनय दुबे याच्यावर लावण्यात आला आहे. या प्रकरणी त्याला आज वांद्रे कोर्टात हजर करण्यात आले होते. तर आता विनय याला अटक केली असून त्याला 21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच 3 एफआयआर सुद्धा पोलिसात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई पोलिसातील डीसीपी अभिषेक त्रिमुखी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाउनच्या काळात वांद्रे स्थानकाबाहेर गर्दी केल्याच्या प्रकरणी 3 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणी अधिक व्हिडिओ आणि माहितीचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या प्रकरणातील एक आरोपी विनय दुबे याला अटक केली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.(रेल्वेच्या पत्रामुळे गैरसमज, वांद्रे येथील घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या लोकांवर कारवाई होणार- अशोक चव्हाण)
3 FIRs registered in connection with yesterday's gathering in Bandra. We are looking into the videos&all details. In connection with one of the 3 cases, one accused Vinay Dubey has been arrested&sent to police custody till 21 April: Abhishek Trimukhe DCP (Zone IX), Mumbai Police pic.twitter.com/ufqCmhrN7d
— ANI (@ANI) April 15, 2020
दरम्यान, विनय दुबे याने एक व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट करुन कामगार वर्गाला भडकवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे विनयच्या विरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. साथिचा रोग पसरवण्यासाठी लोकांना एकत्र केल्याचा आरोप ही विनय याच्यावर लावण्यात आला आहे. वांद्रे येथील घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले असून या प्रकरणी नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.