चिखलफेक आंदोलन बाळासाहेब ठाकरे यांना आवडलं असतं- नितेश राणे यांची सावंतवाडी कारागृहाबाहेर आल्यानंतर प्रतिक्रिया
NItesh rane (Photo Credits: ANI)

सरकारी अधिकार्‍यावर चिखल फेकल्याप्रकरणी अटकेत असलेले कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांची काल (10जुलै) रात्री उशिरा सुटका झाली. सावंतवाडी कारागृहात असलेले नितेश राणे आणि अन्य 18 आरोपींना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर मीडीयाशी बोलताना नितेश राणे यांनी चिखलफेक आंदोलन बाळासाहेबांना आवाडलं असतं अशा आशयाची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच कलम 353 बदद्ल नितेश राणेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याला कवच म्हणून वापरा शस्त्र म्हणून नव्हे अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रस्त्यांच्या निकृष्ट कामाबाबत नितेश राणे आक्रमक; अधिकाऱ्याला चोप देत घातली चिखलाची अंघोळ 

नितेश राणे ट्वीट

रात्री नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून लवकरच झालेला सारा प्रकार फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून सांगणार आहे अशा आशयाचं एक ट्वीट देखील केलं आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उप अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर नितेश राणे यांनी चिखलफेक केली होती. तसेच अर्वाच्च भाषेचा वापर करत स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेडेकरांना गडनदी पुलाला बांधले होते. या प्रकारानंतर नितेश राणे सह 50 समर्थकांवर कलम 353, 342, 332, 324, 323, 120(अ), 147, 143, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.