Multi-layered Cloth Masks। Photo Credits: Sheetal Amte Facebok Account

महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता त्याला रोखण्यासाठी आता आरोग्यक्षेत्रातील तज्ञांसोबतच अनेक समाजातील अनेक घटकांनी पुढाकार घेऊन मदत करण्यास सुरूवात केली आहे. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची तिसरी पिढी देखील आता कोव्हिड 19 (Covid 10) आजाराला रोखण्यासाठी सज्ज झाली आहे. आनंदवन या बाबा आमटेंच्या कुष्ठरोग्यांसाठी असलेल्या संस्थेकडून आता कापडाची थ्री लेयर मास्क निर्मिती सुरू झाली आहे. भारतासह महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या रोखण्याचं सध्या मोठं आव्हान आरोग्ययंत्रणेसमोर आहे. अशामध्ये पीपीई, मास्क, व्हेटिंलेटर यांचा ठराविक साठा आपल्याकडे असल्याने त्याचा विचारपूर्वक वापर करावा लागत आहे. या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आता प्रशासनाच्या मदतीला आनंदवन (Anandwan) धावून आलं आहे. सध्या आनंदवनमध्ये मास्कची निर्मिती करण्यासाठी खास युनिट सुरू करण्यात आलं आहे. Coronavirus Outbreak: मास्क वापरून COVID 19 चा धोका टाळता येऊ शकतो का? जाणून घ्या या '8' टीप्स.  

आनंदवनमध्ये तयार केले जाणारे थ्री लेयर मास्क हे धुवून पुन्हा वापरता येऊ शकतात. महारोगी सेवा समितीच्या अध्यक्षा शीतल आमटे यांनी Mirror ला दिलेल्या माहितीनुसार, 'देशात प्रोटेक्टिव्ह गियर सह अनेक अत्यावश्यक वस्तूंचा ठराविक साठा आहे. सरकारने संचारबंदी जाहीर करण्यापूर्वीच 10 दिवसाआधीपासुन आम्ही क्वारंटाईन होण्यास सुरूवात केली होती. त्यावेळेस पीपीई किट्सची कमतरता असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र आम्ही आमच्यापरीने आरोग्ययंत्रणेतील लोकांना मदत करण्यासाठी मास्कची निर्मिती करायला सुरूवात केली'. आनंदवनमध्ये कापडाची निर्मिती करणारं युनिट असल्याने मास्कची निर्मिती करणं शक्य होतं. त्यानुसार आम्ही सॅम्पल मास्क बनवून सरकारला पाठवला. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर सरकारकडून मास्क बनवून देण्याची शिफारस आल्याने आता त्याचे प्रमाण वाढल्याचेही शीतल आमटे यांनी सांगितले आहे. Coronavirus In Maharashtra: मंत्रालयामध्ये अधिकारी, कर्मचारी सह भेट देणार्‍यांंना फेस मास्क बंधनकारक; महाराष्ट्र सरकारचा नवा नियम

सरकारच्या नियमावलीनुसार थ्री लेयर मास्क बनवलं जात आहे. आनंदवनमध्ये बनवली जाणारी मास्क थ्री लेयर असली तरीही त्याद्वारा योग्यरित्या श्वासोच्छावास घेतला जाईल याची खबरदारी पाळली जात आहे. सरकारकडून आनंदवनकडे 40,000 मास्कची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी 3600 मास्क बनवून तयार आहेत, 1390 मास्क वाटण्यात आले आहे. मास्कच्या निर्जुंतिकीकरणासाठी देखील दोन खास पाऊच बनवले जात आहेत.

सध्या देशभरात लॉकडाऊन असल्याने कच्चा मालाच्या आयातीला आणि मास्क पाठवण्याच्या कामामध्ये थोडा अडथळा आहे. मात्र गरजूंना सर्वात आधी मास्क पोहचवण्याकडे आनंदवनचं प्राधान्य आहे. दिवसाला प्रत्येकाला किमान 3 मास्क पोहचवण्याकडे आमचं प्राधान्य असेल. मात्र नीट धुवून आणि पाऊच नुसार सॅनिटाईज केल्यास त्याचा वापर फायदेशीर होईल. सध्या पीपीई कीट बनवण्याचाही आमचा प्रयत्न आहे. मात्र त्याच्या नियमावलीनुसार बनवण्याचं आव्हान असल्याने सध्या ते काम स्थगित करण्यात आलं आहे.