Representational Image (Photo Credits: IANS)

भारताची आर्थिक राजधानी मुंबई शहर सध्या कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडलं आहे. देशामध्ये सध्या 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन असल्याने अनेकांवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात अवघ्या 5% कर्मचार्‍यांसह कामकाज सुरू आहे. मात्र कोरोनाचा वाढता विळखा पाहता आता सरकारने मंत्रालयात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला फेस मास्क घालणं बंधनकारक केलं आहे. सरकारी कार्यालयातील सारे कर्मचारी, ऑफिसर, व्हिजिटर्स यांना फेस मास्क घालणं पुढील काही महिन्यांसाठी बंधनकारक आहे. महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या अंतर्गत राज्यात मास्क आणि व्हेंटिलेटर मुबलक प्रमाणात उपलब्ध; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितली सुविधांची आकडेवारी

महाराष्ट्रात सध्या देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रूग्ण आहेत. तर शहरी भागात मुंबई आघाडीवर असल्याने आता खबरदारीचा उपाय म्हणून काही नियम कडक केले जात आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंगापूर आणि इतर देशांप्रमाणेच लवकरच आपल्याकडेअही फेस मास्क घालणं बंधनकारक करण्याबाबतचे संकेत दिले होते. अमेरिकेमध्येही लोकांना बाहेर पडताना फेस मास्क घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  Coronavirus Outbreak: मास्क वापरून COVID 19 चा धोका टाळता येऊ शकतो का? जाणून घ्या या '8' टीप्स.  

ANI Tweet

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन 25 मार्चला जाहीर केला. त्यानुसार 14 एप्रिलपर्यंत संचारबंदी आहे. मात्र या काळात नागरिकांना केवळ अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाहेर पडण्याची मुभा होती. मात्र भाजीपाला, किराणा माल घेण्यासाठी अजुनही शहरी, ग्रामीण भागात गर्दी होत असल्याने आता नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरणं बंधनकारक केलं जाऊ शकतं. 14 एप्रिलला लॉकडाऊनचा काळ संपल्यानंतर काय? हा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे. मात्र राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आणि स्थिती पाहूनच पुढील निर्णय घेतला जाईल असा सावध इशारा सरकारकडून दिला जात आहे.