मुंबईत नागरिकांना अवघ्या कमी वेळात एखाद्या ठिकाणी पोहचवण्यासाठी नेहमीच सेवेत असणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी उपलब्ध असतात. मात्र आता येत्या काळात रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात 1 ते 3 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. तर खासगी कंपन्यांकडून सुद्धा सुरु करण्यात आलेल्या ओला, उबर सारख्या सेवेमुळे लोकल प्रवासाच्या सुविधेला फटका बसला आहे. तर नव्या सरकराच्या धोरणानुसार दर भाडे किती असणार आहे त्याबाबत ठरवण्यात आले आहे. त्यामुळेच रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यात 70 हजारांपेक्षा अधिक टॅक्सी तर 10 लाखांपर्यंत रिक्षाची संख्या आहे. काळ्या पिवळ्या टॅक्सीसाठी 9 वर्षांची तर रिक्षांसाठी 15 वर्षांची मर्यादा आहे. निवृ्त्त आयएएस अधिकाबी बी.सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती 2012 मध्ये नेमण्यात आली होती. त्यानुसार हकीम समितीच्या नुसार, राज्य परिवहन प्राधिकरणाने ऑगस्ट 2013 मध्ये टॅक्सीचे टॅक्सीचे आयुर्मान कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता रिक्षा किंवा टॅक्सीच्या नवीन भाडेसुत्राच्या शिफारसीनुसार शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे.(मुंबई: जून 2020 पासून 'काली-पिली' पद्मिनी टॅक्सी होणार गायब; देखरेखीसाठी अडचण येत असल्याने युनियनचा मोठा निर्णय)
तर काळ्या पिवळ्या टॅक्सीसह रिक्षासाठी काही शिफारसी ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार एलईडी इंडिकेटर्स असणे अनिवार्य आहे. यामुळे प्रवाशांना गाडी प्रवासासाठी उपलब्ध आहे की नाही हे कळू शकणार आहे. तसेच काळ्या पिवळ्या टॅक्सीत एसीसाठी अतिरिक्त पैसे वसूल केले जाणार आहेत. अॅप आधारित कॅबच्या चालकांना निळ्या रंगाचे शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट असा ड्रेसकोट असणार आहे.