Mumbai Kali-Peeli Padmini Taxi To Stop service (Photo Credits: ANI)

मुंबई (Mumbai) शहराचे नाव घेताच चटकन डोळ्यासमोर उभ्या राहणाऱ्या काही गोष्टींमध्ये काली पिली पद्मिनी टॅक्सी (Kali-Peeli Padmini Taxi) आवर्जून समाविष्ट असते. भारतीय- इटालियन शैलीच्या या टॅक्सीने साधारण सर्वानीच प्रवास केला असेल, बॉलिवूड पासून ते सामान्यांपर्यंत सर्वांमध्ये फेमस असणारी ही पद्मिनी टॅक्सी येत्या वर्षात म्हणजेच 2020 च्या जून महिन्यात मुंबईच्या रस्त्यावरून पूर्णतः गायब होणार असल्याचे समजत आहे. मुंबई टॅक्सी चालक संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, साल 2000 मध्येच याप्रकारच्या टॅक्सी चे उत्पादन बंद झाले होते, आताच्या पिढीच्या बदलत्या मागण्या आणि या टॅक्सीच्या देखरेखीत होणारा खर्च पाहता येत्या काळात पद्मिनी टॅक्सी चालवणे कठीण होणार आहे.

आरटीओ च्या नियमानुसार एक वाहन 20 वर्षाहून अधिक काळ वापरण्यावर बंधन लावण्यात आले आहे. त्यामुले येत्या काळात ही टॅक्सी सुरु ठेवण्याची काहीच शक्यता नाही त्यामुळेच ही सेवा बंद करण्याचा निर्णय युनियनने घेतला आहे. असं असलं तरी मुंबईकरांना एकेकाळी 24 तास सेवा पुरवणाऱ्या या टॅक्सीला संग्रहालयात ठेवण्याची मागणी युनियन तर्फे करण्यात आली आहे.

खुशखबर! मुंबईत लवकरच सुरु होणार Water Taxi; प्रवासाचा वेळ होणार दीड तासावरून अर्धा तास; जाणून घ्या मार्ग

ANI ट्विट

एकीकडे पाहायला गेल्यास आता मुंबईमध्ये साधारणतःच टॅक्सी सर्व्हिस फार कमी प्रमाणात वापरली जाते यामागे ओला- उबर सारख्या सुविधांचा वाढता वापर हे एक कारण असू शकते. तसेच ज्या उर्वरित टॅक्सी आहेत त्यामध्ये सँट्रो, अल्टो गाड्यांचा वापर अधिक आहे त्यामुळे पद्मिनी टॅक्सीचे प्रमाण आधीच घटले असून आता काही 50 टॅक्सी पाहायला मिळत असतील.

दरम्यान, पद्मिनी टॅक्सीसेवा ही 1964 साली भारतात सुरु करण्यात आली होती. Fiat 1100, या गाडीच्या मॉडर्न विदेशी लूक मुळे काहीच दिवसात या सुविधेचा वापर वाढला होता. सुरुवातीला ही सेवा प्रीमियर प्रेसिडेंट म्ह्णून ओळखली जात होती ज्यानंतर नाव बदलून प्रीमियर पद्मिनी असे ठेवण्यात आले.