Fraud Alert | (Photo credit: archived, edited, representative image)

Digital Payment Fraud Mumbai: वकील म्हणजे कायदेपंडीत मनुष्य. पण तो देखील गंडला जाऊ शकतो, यावर खूपच कमी लोक विश्वास ठेवतील. पण, असे घडले आहे खरे. मुंबई येथे एका ऑटो चालकाने वकील महोदयांना गंडा घातला आहे. आणि त्यात कारण ठरला आहे चष्मा. कसे? त्याचे घडले असे, गुगल पे (Scam) वापरून डिजिटल व्यवहारासाठी ग्राहकाने मोबाईल फोन दिल्याने मुंबईतील एका ऑटोरिक्षा चालकाने 30 वर्षीय व्यक्तीची 90,518 रुपयांची फसवणूक (Auto Driver Fraud Case) केल्याचा आरोप आहे. फसवणूक झालेला व्यक्ती पेशाने कॉर्पोरेट वकिल आहे. मुंबईतील काही कामानिमित्त त्याने सदर रिक्षाचालकाची रिक्षा भाड्याने घेतली होती. या रिक्षाने त्याने मुंबईतील अंधेरी ते वांद्रे दरम्यान प्रवास केला. ही घटना 10 एप्रिलच्या पहाटे घडली, परंतु पीडित व्यक्ती कामात व्यग्र असल्याने चंदीगडला पोहोचली गेली होती. काम संपवून परतल्यावर सदर व्यक्तीने पोलीस स्टेशन गाठले आणि 22 मे रोजी तक्रार दिली. ज्यावरुन एफआयआर (Online Payment Scam) नोंदवण्यात आला.

चष्मा विसरल्याने फसवणूक

तक्रारदार अमूल्य शर्मा, जो मूळचा वांद्रे पश्चिम येथील पेरी क्रॉस रोड येथे राहतो आणि मूळचा हरियाणातील पंचकुला येथील रहिवासी आहे. घटना घडली त्या दिवशी 10 एप्रिल रोजी सकाळी 5.45 वाजता अंधेरी येथील एका रेस्टॉरंटमधून तो वांद्रे येथील त्याच्या घरी गेला होता. घरी जाताना तो आपला चष्मा रेस्टॉरंटमध्ये विसरला. त्यामुळे त्याला अंधुक दिसत होते. दृष्टी साफ नसल्याने त्याला म्हणजेच शर्मा यास मोबाईल वापरण्यात अडथळा येत होता. त्याला त्याचा मोबाईल स्क्रीन स्पष्टपणे वापरता येत नव्हता. परिणामी ऑटोचे भाडे भरण्यासाठी त्याने त्याचा फोन आणि पेमेंट अॅप पासवर्ड ऑटो चालकाला दिला. चालकाने गूगल पे वापरताना त्याची फसवणूक केली.

भाडे नाकारुन अवास्थव रकमेची मागणी आणि फसवणूक

वांद्रे येथे पोहोचल्यावर, ऑटो चालकाने मीटरने शुल्क आकारण्यास नकार दिला आणि ₹1,500 ची मागणी केली. सुरुवातीला वाद होऊनही, शर्माने मागणी मान्य केली आणि चालकाला त्याच्या फोनवर पेमेंट पूर्ण करण्याची परवानगी दिली. तथापि, फक्त भाडे आकारण्याऐवजी, ऑटो चालकावर शर्माच्या बँक खात्यातून ₹90,518 मोहम्मद फुरकान शेख या नावाने एका खात्यात ट्रान्सफर केल्याचा आरोप आहे. (हेही वाचा, RTGS Error Cyber Crime: आरटीजीएस करताना चूक, 1.59 गमावले; Pahalgam Terror Attack नंतर भारतावरील सायबर हल्ले वाढले)

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास

वांद्रे पोलिसांनी पुष्टी केली की निधी त्वरित अनेक बँक खात्यांमध्ये पाठवण्यात आला आणि काढला गेला. तपासकर्त्यांना संशय आहे की शेख हा या प्रकरणात सहभागी असलेला ऑटो चालक असू शकतो. ते सध्या सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करत आहेत आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि चोरीला गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी सायबर क्राइम टीमकडून तांत्रिक मदत मागितली आहे. हेही वाचा, Cyber Slavery Racket: ऑनलाईन गुन्हेगारीसाठी भारतीय व्यक्तीची म्यानमारला तस्करी; महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून चौघांना अटक)

खाते रिकामे होताच हादरला वकील

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सकाळी 11 वाजता उठल्यानंतर, शर्मा यांनी त्यांचा फोन तपासला आणि त्यांच्या बँक खात्यातून 90,518 रुपये कापले गेल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. त्यांनी ताबडतोब त्यांच्या बँकेला माहिती दिली आणि नंतर मुंबईत परतल्यानंतर औपचारिक तक्रार दाखल केली. तपासाचे नेतृत्व करणारे उपनिरीक्षक कपिल शिरसाट म्हणाले, संशयित मोहम्मद फुरकान शेखविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि आम्ही कठोर कारवाई करू. आमची सायबर टीम पैशांचा माग काढण्याचे आणि संबंधित सर्व खात्यांची ओळख पटवण्याचे काम करत आहे.

दरम्यान, व्यवहाराची माहिती मिळविण्यासाठी अधिकारी बँकांशी समन्वय साधत आहेत आणि फसवणुकीत सहभागी असलेल्या ऑटोरिक्षाला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.