औरंगाबाद:  हंडाभर पाण्यासाठी दहा वर्षाचा चिमुकला करतो रेल्वेचा 14 किमी प्रवास, गावात दुष्काळाचे सावट
Drought In Maharashtra (Photo Credits: Wire)

महाराष्ट्रात पावसाचे आगमन झाले असले तरी दुष्काळाचे (Drought In Maharashtra) सावट मात्र अजूनही कायम आहे याचा प्रत्यय देणारी एक भीषण घटना सध्या औरंगाबाद (Aurangabad)  मधून पुढे येत आहे. सिद्धार्थ ढगे (Siddharth Dhage) हा दहा वर्षाचा चिमुकला हंडाभर पाण्यासाठी रोज तब्बल 14 किमी रेल्वेचा प्रवास करतो .मराठवाडा (Marathwada) व विदर्भ (Vidarbh) अद्याप दुष्काळाने त्रासला असून जवळपास 7  हजार गावांना या परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे. काही लिटर पाण्यासाठी देखील अनेकांना तासंतास पायपीट करावी लागते. यापैकीच एक असलेल्या सिद्धार्थची पाण्याची वणवण कोणाच्याही डोळ्यात टचकन आणून जाते.

औरंगाबाद- हैद्राबाद पॅसेंजर गाडी आपले अंतिम स्थानक औरंगाबाद येथे पोहचताच सिद्धार्थ सह अन्य दुष्काळग्रस्त मंडळींचा पाण्यासाठी संघर्ष सुरु होतो. प्रवासी ट्रेनमधून उतरल्यावर स्वच्छता करण्यासाठी या ठिकाणी ट्रेन काहीच क्षण थांबते.  यावेळी रेल्वेट्रॅकला लागून असणाऱ्या नळांमधून पाणी रेल्वेच्या टाकीत भरले जाते. सिद्धार्थ व अन्य मंडळी त्यावेळी या गाडीत चढतात आणि तिथून पुढे सात किमी प्रवास करून आपल्यासोबत आणलेल्या दोन हंड्यांमधून पाणी भरून घेतात. पुढच्या स्थानकात उतरून पुन्हा आपल्या गावाकडे येण्यासाठी सात किमी परतीचा प्रवास करून मग अखेरीस घराची वाट धरतात.

दुपारी सुरु होणार हा प्रवास संध्याकाळी 5  वाजेपर्यंत सुरु असतो. या प्रवासाच्या वेळी ट्रेन नेहमीच गच्च भरलेली असते त्यामुळे एवढ्या मेहनतीने भरलेल्या पाण्याची सांडलवंड होऊ नये याची काळजी घेत हा चिमुकला जीव रोज पाण्यासाठी असा संघर्ष करतो . आटलेली विहीर अजून खोदली, आता तासाला एक घागर पाणी; 2 हंडा पाण्यासाठी महिला रात्रभर रांगेत

असा संघर्ष करणारा सिद्धार्थ हा काही एकमेव उदाहरण नाही तर त्याच्याच गावातील साथ वर्षीय सुमनबाई यांना देखील रोज अशा प्रकारे पाण्यासाठी रेल्वे वर अवलंबून राहावे लागते, वास्तविकता सुमन यांच्याकडे 300 फूट खोल बोअरवेल देखील आहे मात्र एप्रिल पासून वाढत्या तापमानमुले ही बोअरवेल पुरती सुकली आहे. या दोघांच्या गावात जवळपास 300 घर असून 200 लिटर पाण्यासाठी साठ ते सत्तर रुपये खर्च करावे लागतात, ज्यांना शक्य आहे ते पैसे देऊन पाणी विकत घेतात आणि ज्यांना काहीच पर्याय नाही ते अशा प्रकारचा संघर्ष करत आपले दिवस काढतात.