Asha Workers on Strike: महाराष्ट्रातील 70 हजार आशा कर्मचारी आजपासून संपावर, विविध मागण्या मान्य करण्यासाठी Work From Home
Asha workers | (Photo Credits: File Image)

राज्यातील आशा कर्मचारी आजपासून संपावर ( Asha Workers on Strike in Maharashtra) जात आहेत. अनेकदा मागण्या करुनही मागण्या मान्य होत नाहीत. त्या मागण्या पूर्ण करण्याबाबत काही पावलेही टाकली जात नाहीत. अशा स्थितीत काम करणे कठीण आहे. आमचा संताप आता अनावर होत आहे, असा इशारा आशा कर्मचारी संघटनांनी दिला आहे. राज्यात सुमारे 72 हजारांहून अधिक संख्येने आशा कर्मचारी (Asha Workers in Maharashtra) आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. त्यामुळे हे कर्मचारी कामावर न जाता घरी बसून संप करणार असल्याची माहिती आशा वर्कर (Asha Workers) संघटनेचे कृती समिती अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी दिला आहे.

आशा वर्कर संघटनेचे कृती समिती अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी यांनी राज्य सरकारवर टीका करत म्हटले की, आशा कर्मचाऱ्यांच्या कामाला मानाचा मुजरा करतात. परंतु, त्यांना देत काहीच नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर संप करा आमचे आम्ही बघुन घेऊन असे म्हटले आहे. त्यामुळे राज्यभरात असलेल्या 70 हजार आशा वर्कर आणि 4 हजा गट प्रवर्तक एकत्र येऊन हा संप करत असल्याचे एम. ए. पाटील यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Coronavirus: कोरोना व्हायरस संकटात कार्यरत असणाऱ्या ग्रामपंचायत, अंगणवाडी कर्मचारी, आशा कार्यकर्तींना 25 लाख रुपयांचे विमा संरक्षण: महाराष्ट्र सरकार )

आशा कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत. यामध्ये केंद्र सरकार कोरोना काळात प्रति दिन 33 या प्रमाणे प्रति महिना 1000 रुपये देत असते. परंतू, हे पैसेही वेळेवर मिळत नाही. त्यात हे पैसेही पुरेसे नाहीत. केंद्र सरकारने प्रति दिन 300 रुपये मानधन द्यावे, अशी आशा कर्मचाऱ्यांची मागणी आहे. याशिवाय कोरोना काळात आशा कर्मचारी, गट प्रवर्तक महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात राखीव बेड असायला हवेत. आशा कर्मचाऱ्यांना मास्क, पीपीइ किट, ग्लोव्हज, सॅनिटाइजर आवश्यक प्रमाणात मिळावेत. याशिवाय सॅनिटायझर, मास्क यांसारखी सुरक्षा साधणेही मिळावीत, अशी आशा कर्मचाऱ्यांची मागणी आहे. राज्यभरातील सुमारे 3 हजार पेक्षा अधिक आशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला. परंतू, त्यांना कोणतीही आरोग्य सुविधा देण्यात आली नाही. त्यामुळे ही सुविधा मिळाली. याशिवा ज्या आशा कर्मचाऱ्यांचे कोरोना काळात निधन झाले त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक मदत मिळावी. कोरोना काळात केवल 4 तास काम करणे अपेक्षित असते. असे असले तरी प्रत्यक्षात मात्र 12 तास काम करावे लागत आहे. त्यामुळे कामाच्या तासांवर योग्य तो विचार व्हावा, अशी आशा वर्कर्सची मागणी आहे.