Image used for Representational Purpose | (Photo Credits: File Photo)

पीएमसी बॅंकेतील ठेवीदार (PMC Bank Depositor) गेल्या अनेक दिवसांपासून आपले पैसे परत मिळावे, यासाठी अंदोलन करत आहेत. पीएमसी बॅंकेने आज सातवा बळी घेतला आहे. पीएमसी बॅंकेत अडकलेले पैसे मिळतील की नाही या चिंतेत असलेल्या आणखी एका ठेवीदार महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना खारघर (Kharghar) येथे घडली. मृत महिलेचे पीएमसी बॅंकेत सुमारे 17 लाख रुपये अकडले आहेत. तसेच वाहन्यावर बॅंकसंदर्भात बातम्या पाहून ती महिला झोपायला गेली. त्यानंतर 2 तासांतच या महिलेला त्रास जाणवू लागला. त्यानंतर कुटुंबियांनी या महिलेला जवळील रुग्णालयात घेवून गेले. परंतु, रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच या महिलेचा हृदय विकाराचा झटक्याने मृत्यू झाला.

द हिंदुने दिलेल्या वृत्तानुसार, कुलदिपकौर असे या मृत महिलेचे नाव आहे. कुलदिपकौर या खारघर येथील रहिवासी आहे. तसेच त्या आपला मुलगा, सून आणि मुलगी यांच्यासह सेक्टर-10 मध्ये राहत होत्या. कुलदिपकौर यांचे पती वरिंदरसिंग विग, मुलगा सुखबिरसिंग या तिघांचे पीएमसी बँकेमध्ये खाते होते. तसेच तीघांचे पैसे मिळून पीएमसी बँकेमध्ये 15 लाख रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट होते. कुलदिपकौर आणि वरिंदरसिंग या पतीपत्नीच्या खात्यामध्ये दीड लाख रुपयांची तर, सुखबीर याच्या खात्यामध्ये 70 हजारांची रक्कम होती. गेल्या अनेक दिवसांपासून पीएमसी बॅंकेतील ठेवीदार आपले हक्काचे पैसे मिळवण्यासाठी नको ते प्रयत्न करत आहेत. एवढेच नव्हे तर, ठेविदार आरबीआयच्या कार्यलयाबाहेर अंदोलनही करत आहेत. परंतु, कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. यामुळे आपण ठेवलेले पैसे परत मिळतील का नाही, अशी कुलदिपकौर यांच्या मनात भिती निर्माण झाली होती. त्या दररोज पीएमसी संदर्भातील बातम्या पाहत असे. बुधवारीही त्यांनी पीएमसी बॅंकेसंदर्भात बातम्या पाहून झोपल्यानंतर काही तासातच त्यांना हृदयाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी कुलदिपकौर यांना रुग्णालयात घेऊन गेले असताना रस्त्यातच त्यांच्या हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, अशी माहिती कुंटुंबियांनी दिली आहे. हे देखील वाचा-पीएमसी बॅंक घोटाळा: मुंबईतील पीएमसी बॅंक ठेविदार संजय गुलाटी यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू, सोमवारी कोर्टाबाहेर केले होते निदर्शन

पीएमसी बॅंक घोटाळ्यानंतर ही सातवी घटना आहे. या आधीही पीएमसी बॅंकेतील 6 ठेविदारांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूला बॅंक जबाबदार आहे, असे ठेवीदार बोलत आहेत. त्याचबरोबर ठेवीदारांना त्यांचे पैसे कधी परत मिळतील याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.