मुंबई येथील एस्प्लानेड कोर्टाबाहेर निषेध मोर्चा करुन घरी परतल्यानंतर पीएमसी बॅंक ठेवीदाराचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. एएनआनने दिलेल्या माहितीनुसार, 51 वर्षीय संजय गुलाटी यांंचे निधन झाले आहे. पीएमसी बँकेच्या ठेवीदारांनी सोमवारी मुंबईतील एस्प्लानेड कोर्टाबाहेर निषेध नोंदविला आणि त्यांच्या पैशाची परतफेड बँकेकडून करावी, अशी मागणी केली होती. निषेध मोर्चाच्या वेळी ठेवीदारांनी दावा होता की , त्यांचा मुख्य मुद्दा म्हणजे, सर्व पीएमसी बँक ठेवीदारांचे पैसे परत करावे. सध्या सुरू असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यापूर्वी 10 ऑक्टोबरला पीएमसी बँकेच्या ग्राहकांची भेट घेवून त्यांचे हाल ऐकले होते.

पीएमसीकडून एचडीआयएलला कर्ज देण्यात आले होते, मात्र एचडीआयएलने कर्जाची रक्कम वेळेत न भरल्याने पीएमसी बँक आणि बँकेतील खातेदार आता अडचणीत आले आहेत.बँकेला 4355.43 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याबद्दल हा एफआयआर नोंदविण्यात आला आहे. अहवालानुसार पीएमसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (आता निलंबित) जॉय थॉमस, अध्यक्ष वरम सिंग आणि अन्य अधिकाऱ्यांची नावे आहेत.

एएनआयचे ट्वीट-

याआधी आरबीआयने पीएमसी खातेधारकांना दिलासा देत पुढील सहा महिन्यांसाठी 3,000 वरुन 10,000 रक्कम काढण्याची मुभा दिली होती. त्यानंतर त्यावर काही दिवसांनी म्हणजेच 3 ऑक्टोबरला ही रक्कम 25,000 पर्यंत केली. आता त्यात आणखी बदल ही रकम वाढवून 40,000 रुपये केली आहे.