रत्नागिरी (Ratnagiri) मध्ये दापोली (Dapoli) तालुक्यात आंजर्ले समुद्रकिनारी (Anjarle Beach) 6 पर्यटक बुडाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या सहा जणांपैकी 3 जणांचा मृत्यू झाला असून अन्य 3 जण बचावले आहेत. दरम्यान हे सारे पर्यटक पुण्याचे आहे. स्थानिकांच्या मदतीने यांना सुखरूप वाचवण्यात यश आले. या घटनेची माहिती मिळताच दापोलि पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, 14 पर्यटक पुण्याच्या औंढ भागातून रत्नागिरीला आले होते. आज (18 डिसेंबर) दिवशी सकाळी ते समुद्र किनारी फिरायला गेले होते. पण पाण्याचा अंदाज न आल्यने सहा जण पाण्यात बुडाले. स्थानिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी पर्यटकांना मदत केली यामध्ये 3 जणांना वाचवण्यात त्यांना यश आलं. दरम्यान हे तिन्ही पर्यटक सध्या जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल आहेत. रत्नागिरी: गणपतीपुळे येथील समुद्रात पोहण्यासाठी गेलेले 3 जण बुडाले, दोघांचे मृतदेह सापडले.
निहाल चव्हाण, अक्षय राखेलकर, उबेस खान, रोहित पालांडे, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे अशी या सहा पर्यटकांची नावं आहेत. दरम्यन या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकं आणि पोलिसांनी धाव घेतली. त्यानंतर याचा पोलिस तपास सुरू झाला आहे. लॉकडाऊन दरम्यान पर्यटन बंद होतं. आता लॉकडाऊनमधून दिलेली शिथिलता आणि सुरू झालेला सुट्ट्यांचा काळ यामुळे पर्य्टकांची गर्दी समुद्रकिनारी वाढली आहे. पण अतिउत्साही पर्यटकांमुळे अशा घटना घडत असल्याचं समोर आलं आहे.