
Andheri East Bypoll: शिवसेना आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर भाजपने (BJP) दावा सांगितला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गाटाची गोची झाली आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ही रस्सीखेच सुरु आहे. भाजपने या ठिकाणी मुरजी पटेल यांना उमेदवारी दिल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी पक्षांतर्गत सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. शिवसेनेत बंड करुन बाजूला झाल्यानंतर आपणच खरी शिवसेना आहोत, असा एकनाथ शिंदे गाटाचा (Shinde Group) दावा आहे. एकनाथ शिंदे सध्या मुख्यमंत्री पदावर आहेत आणि आपण शिवसेनेचा मुख्यमंत्री आहोत. शिवसेना-भाजप सरकारच सत्तेत आहे, असा त्यांचा दावा असतो. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गट काय भूमिका घेतो याबाबत उत्सुकता आहे.
विधानसभा निवडणूक 2022 मध्ये अंधेरी पूर्व येथून शिवसेनेचे रमेश लटके निवडून आले. विदेशात अलिकडेच त्यांचे निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या जागेवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उमेदवार देणार हे निश्चित. परंतू, आम्हीच खरी शिवसेना असे म्हणनारा एकनाथ शिंदे गट नेमकी काय भिमाका घेतो यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. जर एकनाथ शिंदे यांची शिवसेना मानली तर शिवसेना भाजप युतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे या जागेवर शिवसेनेचा नैसर्गिक हक्क आहे. जर भाजपने या ठिकाणी उमेदवारी दिली तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना नाही. या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार असलेल्या उद्धव ठाकरे याचीच शिवसेना आहे असा अर्थ जनमानसात जाणार आहे. त्यामुळे शिंदे गटाची चांगलीच गोची झाली आहे. (हेही वाचा, Vedanta-Foxconn: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरुन रणकंदण, CM एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचा पाऊस)
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून माजी आमदार दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणी उमेदवारी देण्यासाठी शिंदे गटातून जोरदार हालचाली सुरु होत्या. मात्र, मध्येच आता भाजपने या जागेवर दावा सांगितल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गट विरुद्ध भाजप असा सामना रंगणार की एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना असा सामना रंगणार याबाबत उत्सुकता आहे.