Blast, Image used for representational purpose (Photo Credits: ANI)

Nashik: नाशिकमधील खुटवडनगर परिसरात गॅस गळतीमुळे घरात मोठा स्फोट झाला. या स्फोटात एकाचं कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटात घराचे मोठे नुकसाने झाले आहे. तसेच घरापासून 10 ते 15 फूट अंतरावर असलेल्या वाहनाच्या काचादेखील फुटल्या. स्फोटात जखमी झालेल्या कुटुंबातील सदस्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेत घराच्या भिंतींना तडे गेले असून घराजवळील वाहनांच्या काचा फुटल्या आहेत.

या घटनेनंतर खुटवडनगर परिसरात एकचं खळबळ उडाली. स्फोट झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. नागरिकांनी घरातील जखमी सदस्यांना मदत करून तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (हेही वाचा - Sanitizer Blast in Kolhapur: कोल्हापूरमध्ये कचरा जाळताना सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट; महिलेचा होरपळून मृत्यू)

या स्फोटात घरातील वस्तू जळून खाक झाल्या आहेत. सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. या स्फोटात घरमालक बळीराम पगार, त्यांची पत्नी पुष्पा पगार, आणि नातू रुहान हे जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आलं. (Pune: कुत्र्याला पोत्यात टाकून जिवंत जाळलं; पुण्यातील पिंपलेगुरव भागातील संतापजनक घटना)

दरम्यान, मागील महिन्यात मुंबईतील लालबागमधील साराभाई मेन्शमधील एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता. या स्फोटात 16 जण जखमी झाले होते. विशेष म्हणजे ज्या घरात स्फोट झाला, त्या घरामध्ये लग्नकार्य होतं. त्यामुळे घरात मोठ्या संख्येने पाहुणे उपस्थित होते.