Earthquake Tremors (Photo Credits-Pixabay)

Earthquake In Mumbai: उत्तर मुंबई पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरली आहे. आज सकाळी 6.36 मिनिटांनी मुंबईच्या उत्तर दिशेला 98 किलोमीटर अंतरावर 2.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. यासंदर्भात नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजी (National Centre for Seismology) ने माहिती दिली आहे.

दरम्यान, शुक्रवारी मुंबईच्या उत्तरेस 91 किमी अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल इतकी होती. शुक्रवारी सकाळी 10.33 मिनिटांनी हे धक्के जाणवले होते. भूकंपाच्या धक्क्यांमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या भूंकपामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही. (हेही वाचा - Earthquake In Mumbai: नॉर्थ मुंबईत जाणवले 2.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के)

याशिवाय शुक्रवारी रात्री नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे दोन धक्के जाणवले. यातील पहिला धक्का रात्री 11 वाजून 11 मिनिटांनी नाशिकच्या पश्चिम बाजून 95 किलोमीटर अंतरावर जाणवला. या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल इतकी होती. तसेच दुसरा धक्का नाशिकच्या पश्चिम बाजूस 98 किलोमीटर अंतरावर 12 वाजून 5 मिनिटांनी जाणवला. या भूकंपाची तीव्रता 4.0 इतकी होती.