Amravati: खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र HC कडून रद्द, ठोठावला 2 लाखांचा दंड
Navneet Ravi Rana | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रातील अमरावती येथील खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना बॉम्बे हायकोर्टाने झटका दिला आहे. कोर्टाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले आहे. त्यामुळे राणा यांच्यावर बनावट कागदपत्र तयार केल्याचा आरोप लावण्यात आला होता. कोर्टाने नवनीत राणा यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. राणा यांच्या जात प्रमाणपत्रासंबंधित बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली होती. यामध्ये असे म्हटले होते की, नवनीत राणा या मूळत: पंबाजच्या आहेत.(Maharashtra Government Delegation At Delhi: आरक्षणाबाबतची 50% ची मर्यादा शिथिल करण्याची राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी)

याचिकर्त्याने असे ही म्हटले की, राणा या लबाना जातीमधील आहेत. जी महाराष्ट्रातील SC श्रेणीमध्ये येत नाही. अशातच त्यांनी खोट्या मार्गाने आपले जात प्रमाणपत्र तयार केले. नवनीत राणा यांच्यावर शाळेतील बनावट कागदपत्र दाखवल्याचा आरोप लावला गेला.

अमरावतीमधील खासदार नवनीत राणा या नेहमीच संसदेच्या सत्रादरम्यान चर्चेत यायच्या. गेल्या संसदेच्या सत्रात जेव्हा महाराष्ट्रातील अँन्टेलिया प्रकरणी वाद झाला तेव्हा त्यांनी केंद्र सरकारची बाजू घेतली आणि राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर जोरदार टीका केली होती.(Nawab Malik on PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस मोफत देण्याच्या घोषणेनंतर नवाब मलिक यांची 'या' भाषेत टीका)

राणा यांनी त्यानंतर आरोप लावला होता की, त्यांना शिवसेना नेत्यांकडूम धमकी देण्यात आली होती. हा मुद्दा राणा यांनी लोकसभेचे स्पीकर, गृहमंत्री आणि पंतप्रधानांच्या समोर उपस्थितीत केला होता. दरम्यान, नवनीत राणा यांनी 2014 मध्ये राजकरणात एन्ट्री केली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. मात्र 2019 मध्ये विरोधी पक्षात उतरल्या आणि निवडणूक जिंकल्या. नवनीत राणा यांचे पती रवि राणा महाराष्ट्रात आमदार आहेत.