कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले मंदीर आणि धार्मिक स्थळे आजपासून उघडण्यात आली आहे. विरोधकांच्या भुमिकेमुळेच राज्य सरकारने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे दावा भाजपचे अनेक नेते करत आहेत. यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यात शाब्दीक चकमक सुरु झाली आहे. यावर राष्ट्रवादी खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. श्रेय घेण्यापेक्षा खबरदारी घ्यावी, अशा शब्दात अमोल कोल्हे यांनी भाजपला टोला लगावला आहे, अशी माहिती न्युज 18 लोकमतने आपल्या वृत्तात दिली आहे.
'श्रद्धेच्या बाबतीत राजकारण होत आहे, हे नक्कीच दुर्दैवी आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारने जे काही निर्णय घेतले आहेत जे काही काम केल आहे, हे सर्व स्वागतार्ह होते. मात्र, आनंद साजरा करताना, सोशल डिस्टंन्सिग, मास्कचा वापरणे, हात धुणे ही त्रिसूत्री कायम आचरणात आणायला हवी तेव्हा कोविडंचे संकट संपेल. सण उत्सव असतील, मंदिर उघडण्याचा सोहळा असेल या सर्व गोष्टीत हे पाळल जायला हवे, असे आवाहनही कोल्हे यांनी केले आहे. महत्वाचे म्हणजे, मंदीर उघडण्याचा श्रेय घेण्यापेक्षा खबरदारी घ्यावी, असेही कोल्हे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Neelam Gorhe Criticizes Ram Kadam: रावणासारखी भूमिका घेणाऱ्या राम कदम यांचे नामांतर केले पाहिजे; निलम गोऱ्हे यांची टीका
महाराष्ट्रातील मंदिर खुली करावी, यासाठी भाजपने विविध ठिकाणी आंदोलने केली होती. याचदरम्यान, भाजपाने सिद्धिविनायक मंदिरातही आंदोलन केले होते. केवळ भाजपच नव्हेतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनीही पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर आंदोलन केले होते. दरम्यान, मनसेनेही महाराष्ट्रातील मंदिरे लवकरात लवकर उघडा अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. याशिवाय, एमआयएमनेही प्राथर्नास्थळे आणि मंदिर खुली करण्यासाठी आंदोलन पुकारले होते.
पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व मंदिरांसह प्राथनास्थळे उघडण्याचा राज्य सरकारने निर्णय घतेला होता. मात्र, नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावे लागणार आहे. महत्वाचे म्हणजे, प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा.' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.