Neelam Gorhe Criticizes Ram Kadam: रावणासारखी भूमिका घेणाऱ्या राम कदम यांचे नामांतर केले पाहिजे; निलम गोऱ्हे यांची टीका
Neelam Gorhe, Ram Kadam (Photo Credit: Facebook)

पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्र सरकारचा जनतेच्या दबावामुळे दारुण पराभव आणि महाराष्ट्र जनतेचा मोठा विजय झाला आहे. यामळे आता जल्लोष साजरा करणार, असे भाजप नेते राम कदम (Ram Kadam) यांनी म्हटले आहे. यावर शिवसेना नेत्या आणि विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. रावणासारखी भूमिका घेणाऱ्या राम कदम यांचे नामांतर केले पाहिजे, अशी टीका निलम गोऱ्हे यांनी केली आहे. तसेच राज्यातील मंदीर आणि धार्मिक स्थळ उघडण्याचा निर्णयाचे श्रेय घेणाऱ्यांवरही त्यांनी निशाणा साधला आहे.

दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच सोमवारपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 नोव्हेंबर रोजी केली आहे. मात्र, विरोधकांच्या भुमिकेमुळेच राज्य सरकारने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे दावा भाजपचे अनेक नेते करत आहेत. दरम्यान, निलम गोऱ्हे यांनी पुण्यातील पत्रकार परिषेदेत राम कदम यांच्यावर टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की,“मुळात त्यांच्या नावाचे नामांतर केले गेले पाहिजे. रामाच्या जागी वेगळे नाव ठेवले पाहिजे. मुली पळवण्याची भाषा करतात, रावणासारखी भूमिका घेतात. त्यांचे वर्तन पाहून मार्ग चुकला असल्याचे दिसते,” असे निलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत. हे देखील वाचा- Beed Women Ablaze: बीड येथील पीडित तरुणीच्या मृत्युनंतर देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, बाळा नांदगावकर यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया

 दरम्यान, बीड येथे घडलेल्या धक्कादायक घटनेवर निलम गोऱ्हे यांनी भाष्य केले आहे. “बीड येथील घटना निषेधार्ह असून संबंधित आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे. या मागणीसाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा करणार आहे,” अशी माहिती निलम गोऱ्हे यांनी यावेळी दिली आहे.