Beed Women Ablaze: बीड येथील पीडित तरुणीच्या मृत्युनंतर देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, बाळा नांदगावकर यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया
Devendra Fadnavis, Ramdas Athawale, Bala Nandgaonkar (Photo Credit: FB)

बीडमध्ये (Beed) प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला करुन नंतर पेट्रोल टाकून पेटवून देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा केज रस्त्यावर येलंबघाट येथे ही घटना घडली. या पीडितेचा सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात होता. राजकीय वर्तुळातूनही कठोर कारवाईची मागणी करण्यात येत होती. तसेच या पीडित तरुणीच्या मृत्युनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale), मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

पीडित तरुणी ही नांदेडच्या देगलूर तालुक्यातील शेळगाव येथील रहिवाशी आहे. ती याच गावातील एका तरुणासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही 13 नोव्हेंबर रोजी पुण्याहून गावाकडे जायला निघाले होते. मात्र, तरूणाने पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास येळंबघाट परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी आपली दुचाकी थांबवली. दरम्यान, पीडिताला रस्त्याच्या कडेला घेऊन तिच्यावर तरुणाने अ‍ॅसिड टाकले. त्यांनतर काही वेळाने त्याने पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. त्यानंतर पीडित ही तब्बल 12 तास रस्त्याच्या कडेला पडून होती. त्यावेळी त्या ठिकाणावरून जात असताना गावकऱ्यांनी तिचा आवाज ऐकून पोलिसांत कळवले. त्यानंतर पीडित तरुणीला उपचारासाठी जिल्हा रग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- Ramdas Athawale: महाराष्ट्रातील सर्व मंदिरांसह धार्मिक स्थळे उघडण्याच्या निर्णयावरुन रामदास आठवले यांची राज्य सरकारवर टीका

देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट-

रामदास आठवले यांचे ट्वीट-

बाळा नांदगावकर यांचे ट्विट-

 

अविनाश राजुरे असे त्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला होता. अखेर आरोपी नांदेड पोलिसांच्या हाती लागला असून त्याला बीड पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.