| (Photo Credits: Twitter

नांदेड (Nanded) जिल्ह्यातील बोंडर हवेली (Bondar Haveli) गावातील दलित तरुण अक्षय भालेराव (Akshay Bhalerao) याची हत्या करण्यात आली आहे. लग्नाच्या वरातीत 1 जून रोजी  हा प्रकार घडला. गावातील मराठा तरुणांनी 'गावात भीम जयंती साजरी करता का?' (Does Village Celebrate Bhima Jayanti) असा सवाल विचारत अक्षय (Akshay Bhalerao Murder Case) याला लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर खंजर आणि तलवारीच्या सहाय्याने अक्षय याची भोसकून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. अक्षय याचा भावाने दिलेल्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामिण पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीमध्ये, वरातीत नाचण्यावरुन झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, अक्षयच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी अॅट्रोसिटी अॅक्टअंतर्गत गुन्हे दाखल केले असून 7 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील आणखी दोन आरोपींचा शोध सुरु आहे. घडल्या प्रकारानंतर नांदेड जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता आहे. तर अक्षयच्या समाजामध्ये तीव्र प्रक्षोभ आहे. समाजमाध्यमांवरही या हत्येवरुन तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. (हेही वाचा, Pune: वाघोली येथील गर्भवती महिलेच्या पोटात शेजारी राहणाऱ्या तरुणाने मारली लाथ; महिलेचा गर्भपात, आरोपीला अटक)

ट्विट

अक्षयच्या भावाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अक्षय आणि आकाश सायंकाळी गावातील एका किराणा दुकानात गेले असता काही लोकांनी अक्षयवर जातीवाचक शिवीगाळ करून हल्ला केला. ही मंडळी मुख्य रस्त्यावरून निघालेल्या मराठा वऱ्हाडींच्या मिरवणुकीत सहभागी होती. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, आरडाओरडा आणि डीजे म्युझिकवर नाचण्यासोबतच वरातीत सहभागी काही लोक तलवारी, काठ्या आणि खंजीरही नाचवत होते.

ट्विट

तक्रारीत पुढे म्हंटले आहे की, वरातीत नाचणाऱ्यांमध्ये असलेल्या संतोष संजय तिडके, दत्ता विश्वनाथ तिडके, कृष्णा गोविंद तिडके, निळकंठ रमेश तिडके, नारायण विश्वनाथ तिडके, शिवाजी दिगंबर तिडके यांनी अक्षयला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी अक्षयचा भाऊ आकाश आणि त्याच्या आईलाही मारहाण केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.

ट्विट

दरम्यान, नांदेड पोलीसांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती (अत्याचार निवारण) कायदा 3(1)(आर), 3(1)(एस) आणि 3(2)(वीए) आणि धारा 143, 147 आणि भारतीय दंड संहिता कलम 148, 149, 302, 307, 324, 323, 294 आणि 504 तसेच शस्त्रास्त्र कायद्याची धारा 4, 25 आणि 27 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.