राष्ट्रवादी काँग्रेसच (NCP) पक्षाचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री (Ajit Pawar On CM Post) पदाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि महाराष्ट्र भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे. पुणे येथे पत्रकारांशी बोलताना अजित वार यांनी हे विधान केले आहे. अजित पवार यांनी म्हटले आहे की, 'मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2024 पर्यंत थांबण्याची गरज नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आताही मुख्यमंत्री पदावर दावा ठोकू शकतो', असे विधान अजित पवार यांनी केले आहे.
अजित पवार यांना 'मुख्यमंत्री व्हायला आवडेल का', असे विचारले त्यावर अजित पवार यांनी पत्रकारांना हसत उत्तर दिले. होय, नक्कीच. मुख्यमंत्री 100% व्हायला आवडेल असे उत्तर दिले. हाच धागा पकडत पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील कुठल्या गटाची भाजपसोबत युती करण्याची इच्छा आहे काय? असे विचारले. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अशी कोणत्याच गटाची इच्छा नाही. आम्ही सगळे कार्यकर्ते शिस्त पाळणारे आहोत. सन 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक 71 आमदार निवडून आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहज मुख्यमंत्री होता येत होते. पण, ज्येष्ठ नेतृत्वाने वेगळा आण मोठा निर्णय घेतला. आम्ही सर्वांन तो पाळला. पण काँग्रेसही त्या वेळी मुख्यमंत्री पद द्यायला तयार होती असे, पवार म्हणाले. (हेही वाचा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर)
दरम्यान, शिवसेना पक्षात एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती आपण आणि शरद पवार यांनीही उद्धव ठाकरे यांना दिली होती. शिंदे यांना ठाण्यामध्ये आपल्या आवडीचे अधिकारी नेमण्याची परवानगी देण्यात आली होती. पुढे याच अधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना सूरतपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असे शिंदे म्हणाले.
दरम्यान, राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे गटातीलही काही आमदार अजित पवारांना पाठींबा देण्याची शक्यता आहे. असे घडल्यास दोन्ही बाजूला (शिंदे गट, भाजप) पक्षनेतृत्वावर मोठा दबाव असेल, असे बोलले जात आहे.