महाराष्ट्रात होलिका दहनाच्या आजच्या दिवशी आज राजकीय वर्तुळातही 'शिमगा' सुरू झाला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना मध्ये आज रविवारचं औचित्य साधत 'रोखठोक' सदारात पत्रकार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाविकास आघाडीचीच कानउघडणी केली आहे. जयंत पाटील, दिलीप वळसे पाटिल गृहमंत्री पद स्वीकारू इच्छित नसल्याने अनिल देशमुख अपघाताने गृहमंत्री झाल्यापासून ते अगदी त्यांनी विनाकारण काही वरिष्ठ अधिकार्यांशी पंगा घेतल्याचं वक्तव्य केले आहे. विरोधकांकडून सरकार वर आरोपांच्या फैरी झाडत असताना सरकार मधून कुणीच 'डॅमेज कंट्रोल' साठी पहिल्या 24 तासांत समोर न आल्याने जनतेला देखील सुरूवातीला विरोधकांकडून होणारा हल्लाबोल खरा वाटत होता असं म्हणत राष्ट्रवादी सह सरकारची कानउघडणी केली आहे. पण त्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), नवाब मलिक (Nawab Malik) यांनी थोडी सावध भूमिका घेतल्याचं दिसलं आहे. रोखठोक ची चर्चा सुरू होताच आज संजय राऊतांनी देखील 'बुरा न मानो होली है' म्हणत एक ट्वीट केले आहे. (नक्की वाचा: संजय राऊत यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 'रोखठोक' मधून निशाणा; 'पोलिस खात्याचं नेतृत्त्व 'सेल्यूट' साठी नव्हे कणखर नेतृत्त्व देण्यासाठी' म्हणत सल्ला).
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संजय राऊतांवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे पण त्याांच्यावर Param Bir Singh यांनी केलेल्या आरोपांची निवृत्त High Court Judge कडून चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश असल्याची माहिती मीडियाशी बोलताना दिली आहे.
नवाब मलिक
There should have been strictness in handling the Department (police) as some officers were acting as per their own will: Maharashtra Minister and NCP leader Nawab Malik
— ANI (@ANI) March 28, 2021
नवाब मलिकांनी अनिल देशमुख 'अॅक्सिडेंटल गृहमंत्री' नसल्याचं म्हटलं आहे. पण काही चूका झाल्या असतील आणि त्या सामना मधून समोर येत असतील तर गृहमंत्री त्याचा स्वीकार करून त्याला अनुसरून कामामध्ये बदल करू शकतात असे म्हणाले आहेत.
अजित पवार
मीडीया रिपोर्ट्सनुसार अजित पवारांनी देखील संजय राऊतांच्या 'रोखठोक' ला तशीच प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी देशमुखांची पाठराखण करत 'महाविकास आघाडी सरकार हे तीन पक्षांचे आहे. त्यामुळे कुणी मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये. कुणाला मंत्रिपद द्यायचे, कुणाला कोणता विभाग द्यायचा, हे राष्ट्रवादीमध्ये शरद पवार ठरवत असतात. इतरांनी वक्तव्य केलं तर समजू शकतो. पण महाविकास आघाडीमध्ये असताना मान्यवरांनी एकमेकांना अडचणीत आणण्याचे वक्तव्य करू नये. अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.
जितेंद्र आव्हाड
कान उघाडणी करणं, कौतुक करणं केलेल्या कामाची स्तुती करणं, कधीतरी टिका करणं. हे स्तंभ लेखकांच व पत्रकारांच कामच आहे.
त्याच्यातून शिकायलाही मिळत आणि पुढची पावल कशी टाकायची हे समजूनही घेता येतं.
फक्त आपलं कायम कौतुकच होईल अशी अपेक्षा कोणीच बाळगू नये.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 28, 2021
एनसीपीच्या जितेंद्र आव्हाडांनी सामनाचा रोखठोक सकारात्मक घेतला आहे. त्यांच्यामते 'कान उघाडणी करणं, कौतुक करणं केलेल्या कामाची स्तुती करणं, कधीतरी टिका करणं. हे स्तंभ लेखकांच व पत्रकारांच कामच आहे. त्याच्यातून शिकायलाही मिळत आणि पुढची पावल कशी टाकायची हे समजूनही घेता येतं. फक्त आपलं कायम कौतुकच होईल अशी अपेक्षा कोणीच बाळगू नये.'
संजय राऊत हे शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक देखील आहेत. सामना च्या अग्रलेख आणि रविवारच्या रोख ठोक या सदरामधून ते नेहमीच अवतीभवती घडणार्या सामाजिक, राजकीय स्थितीवर 'ठाकरी भाषेत' भाष्य करत असतात. दरम्यान महाविकास आघाडीची मोळी बांधण्यात शिवसेनेकडून संजय राऊत यांनी मोठी महत्त्वाची भूमिका निभावली आहे.