राजधानी दिल्ली वायुप्रदुषणात (Air Pollution) सर्वात अग्रेसर असल्याचे नेहमीच दिसून आले आहे. खरे तर दिल्ली ज्या कारणांसाठी बदनाम आहे त्यात वायुप्रदुषण हे एक महत्त्वाचे कारण आहे. पण, असे असले तरी महाराष्ट्रही यात कमी नाही. मुंबईपाठपोठ आता पुणे शहरातील हवेची गुणवत्ता (Air Quality Index) खालावल्याचे पुढे आले आहे इतकी की या दोन्ही शहरांच्या तुलनेत (मुंबई, दिल्ली) पुण्यातील हवेत अतिसूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण चक्क (पार्टिक्युलेट मॅटर 2.4) अधिक असल्याचे आढळून आले आहे. पुणे शहरात सध्या विविध ठिकाणी मेट्रो, रस्ते, पूल आणि शासकीय, खासगी इमारती उभारण्याचे काम सुरु आहे. त्यातच सध्या सण, उत्सवांचे दिवस आहेत. शिवाय हे शहर हळूहळू आंतरराष्ट्रीय शहर म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे वाहनांचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे शहरातील वायुप्रदुषणात (Pune Air Pollution) मोठी वाढ दिवसेंदिवस होत आहे.
पुणे शहरात पाठिमागील काही दिवसांपासून नागरिकांना सर्दी, ताप, खोकला आणि श्वसनाशी संबंधित अनेक आजार होऊ लागले आहेत. लहान मुले, महिला आणि वृद्धांमध्ये हे प्रमाण काहीसे अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असा सल्ला अभ्यासक देतात. एक दिवसापूर्वीच मुंबई शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक जवळपास 146 इतका होता. तर त्यालाही पाठिमागे टाकत पुणे शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक 178 वर पोहोचला आहे. पावसाळा संपून हिवाळा सुरु झाला की, या दिवसांमध्ये मुंबई शहरातील हवेचा निर्देशांक दिल्लीपेक्षाही वाईट स्थितीला पोहोचत असल्याचे पाठिमागील चार वर्षांमध्ये पुढे आले आहे. आता पुणेसुद्धा मुंबईच्याच मार्गाने निघाल्याचे पाहाला मिळत आहे.
दिल्लीची हवा मुंबईच्या तुलनेत चांगली
दिल्ली, मुंबई आणि पुणे या तिन्ही शहरांच्या हवा गुणवत्तेच्या निर्देशंकाची तुलना केली असता दिल्लीची स्थिती काहीशी सुधारल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक 110 वर आहे. त्यापाठोपाठ मुंबई, पुण्याच्या निर्देशांकाचा समावेश होतो. दिल्लीच्या हवा गुणवत्तेबद्दल बोलायचे तर तो 110 वर आहे. मुंबई आणि पुणे शहात पीएम 2.5 कणांच्या मात्रेत वाढ झाल्याचे सफरने म्हटले आहे. सफर (SAFAR- The System of Air Quality and Weather Forecasting And Research) ही प्रदुषणावर काम करणारी संस्था आहे.
मेट्रो, रस्ते, इमारती आणि रस्त्यांवरुन धूर ओकत जाणारी चारचाकी वाहने यांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदुषण वाढीस हातभार लागतो. आहे. परिणामी नागरिकांना श्वसनाचे विविध रोग, दमा, टीबी, केंसर ,सर्दी, खोकला, डोळे, त्वचा, आणि हृदयाच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.