मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर शेअर बाजार पुन्हा उसळला; सेन्सेक्स 40,000 च्या पार
शेअर बाजार (Photo Credits: PTI)

दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनाच्या पटांगणामध्ये काल (30 मे) दिवशी भाजप प्रणित एनडीए सरकारचा भव्य शपथविधी सोहळा पार पडला. नरेंद्र मोदी यांच्यासह 58 खासदारांनी या सोहळ्यात शपथ घेतली. आज (31 मे) त्याचा परिणाम शेअर बाजारावरही पहायला मिळाला आहे. रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत आज 186.27 अंकांनी अधिक शेअर बाजार उघडले आहे. आज सेन्सेक्सने मागील रेकॉर्ड मोडत 40,018.24 चा टप्पा गाठला आहे. तर निफ्टी 41.45 अंकांनी अधिक म्हणजे 11,987.35 वर पोहचली आहे.

ANI Tweet

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये भाजप प्रणित एनडीए सरकारने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली स्थिर सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकीच्या एक्झिट पोलच्या अंदांजांपासूनच शेअर बाजारात तेजी पहायला मिळत आहे.