BJP Led NDA 2 Modi Cabinet: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित NDA 2 सरकार मंत्रिमंडळ संपूर्ण यादी, मंत्र्यांच्या नावासह
Prime Minister Narendra Modi | (Photo Credits: ANI)

Modi Cabinet: Full List of Ministers: लोकसभा निवडणूक 2019 साठी झालेल्या मतमोजणीत जनतम भाजप आणि NDA च्या बाजून असल्याचे स्पष्ट झाले. भाजप प्रणित एनडीएला पूर्ण बहुमत मिळाले. आशा पूर्ण बहुमतातील NDA सरकारचा शपथविधी राजधानी दिल्ली येथील राष्ट्रपती भवन परिसरात गुरुवारी (30 मे 2019) पार पडला. या वेळी भाजप आणि एनडीएतील घटक पक्षांच्या 58 खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी शपथ घेतली. तर, राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष अमित शाह, नितीन गडकरी, शिवसेनेचे अरविंद सावंत यांच्यासह इतर खासदारांनी मंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांची पूर्ण नावे आणि ते राज्यमंत्री आहेत की, कॅबिनेट मंत्री इथे पाहा संपूर्ण यादी.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ संपूर्ण यादी इथे पाहा

मंत्र्याचे नाव मंत्रिपदाचा दर्जा राज्यराज्य
नरेंद्र मोदी पंतप्रधान उत्तर प्रदेश
नितीन गडकरी महाराष्ट्र
अमित शहा गुजरात
पीयूष गोयल महाराष्ट्र
राजनाथ सिंह उत्तर प्रदेश
प्रकाश जावडेकर महाराष्ट्र
स्मृती इराणी उत्तर प्रदेश
डॉ. हर्षवर्धन दिल्ली
निर्मला सीतारामन तामिळनाडू
सदानंद गौडा कर्नाटक
नरेंद्रसिंग तोमर मध्य प्रदेश
रमेश पोखरियाल निशंक उत्तराखंड
अर्जुन मुंडा झारखंड
धर्मेंद्र प्रधान ओडिशा
मुख्तार अब्बास नकवी उत्तर प्रदेश
फग्गनसिंह कुलस्ते राज्यमंत्री मध्य प्रदेश
महेंद्रनाथ पांडेय उत्तर प्रदेश
गजेंद्र सिंग शेखावत राजस्थान
संतोष गंगवार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) उत्तर प्रदेश
राव इंद्रजीत सिंह राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरियाणा
नित्यानंद राय राज्यमंत्री बिहार
श्रीपाद नाईक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) गोवा
जितेंद्र सिंह राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जम्मू काश्मीर
प्रल्हाद पटेल राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) मध्य प्रदेश
अर्जुन राम मेघवाल राज्यमंत्री राजस्थान
जनरल व्ही.के.सिंह राज्यमंत्री उत्तर प्रदेश
कृष्णपाल गुर्जर राज्यमंत्री हरियाणा
रावसाहेब दानवे राज्यमंत्री महाराष्ट्र
जी.कृष्ण रेड्डी राज्यमंत्री तेलंगणा
पुरुषोत्तम रुपाला राज्यमंत्री गुजरात
आर.के.सिंह राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) बिहार
मनसुख मांडविया राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) गुजरात
थावरचंद सिंग गेहलोत मध्य प्रदेश
बाबुल सुप्रियो राज्यमंत्री बंगाल
संजीव बालियान राज्यमंत्री उत्तर प्रदेश
संजय धोत्रे राज्यमंत्री महाराष्ट्र
अनुराग ठाकूर राज्यमंत्री हिमाचल प्रदेश
सुरेश अंगडी राज्यमंत्री कर्नाटक
रत्तन लाल कटारिया राज्यमंत्री हरियाणा
व्ही.मुरलीधरन राज्यमंत्री केरळ
रेणुका सिंग सरुता राज्यमंत्री छत्तीसगढ
सोम प्रकाश राज्यमंत्री पंजाब
रामेश्वर तेली राज्यमंत्री आसाम
कैलाश चौधरी राज्यमंत्री राजस्थान
देबोश्री चौधरी राज्यमंत्री पश्चिम बंगाल
रविशंकर प्रसाद बिहार
रामविलास पासवान बिहार
हरसिमरत कौर बादल पंजाब
अरविंद सावंत महाराष्ट्र
रामदास आठवले राज्यमंत्री महाराष्ट्र
साध्वी निरंजन ज्योती राज्यमंत्री मध्य प्रदेश
किरन रिजिजू राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अरुणाचल प्रदेश
गिरीराज सिंह बिहार
एस. जयशंकर माजी परराष्ट्र सचिव
हरदीप सिंग पुरी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) उत्तर प्रदेश
प्रल्हाद जोशी कर्नाटक
प्रताप सारंगी राज्यमंत्री ओडिशा
अश्वनी चौबे राज्यमंत्री बिहार

(हेही वाचा, PM Modi Swearing-in Ceremony 2019: नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे, अरविंद सावंत, संजय धोत्रे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ)

सतराव्या लोकसभेसाठी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्याना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. भाजप प्रणित एनडीए मंत्रिमंडळातील निवडक खासदार देशभरातून पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. शपथविधीपूर्वी महाराष्ट्राच्या वाट्याला या वेळी किती मंत्रिपदं येणार? कोणकोणत्या खासदारांना मंत्रेपदाची संधी मिळते याबाबत उत्सुकता होती. सुरुवातीला मंत्रिपदाच्या चर्चेत शिवसेनेचे अरविंद सावंत, भाजपचे नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, रावसाहेब दाणवे, संजय धोत्रे या मंडळींची नावं आघाडीवर होती. अपेक्षेप्रमाणे या नावांना संधी मिळाली.