Mumbai: कोलकत्ता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर मुंबईत देखील सायन रुग्णालयात धक्कादायक घटना घडली. एका मद्यधुंद रुग्णांने आणि त्याच्या नातेवाईकांनी एका महिला निवासी डॉक्टरला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर सर्वत्र निषेध केला जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवासी डॉक्टरांच्या सुरक्षा वाढव्यात आणि केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करवी अश्या मागण्या सरकार पुढे मांडत आंदोलन करण्यात आले आहे. (हेही वाचा- संतापजनक! प्रेमाला नकार दिल्यामुळे वरिष्ठ डॉक्टराकडून विद्यार्थींनीचा शारीरिक छळ, गुन्हा दाखल)
मिळालेल्या माहितीनुसार, आज मुंबईच्या आझार मैदानावर मूक मोर्चा काढण्यात आला आहे. महिला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या असुरक्षिते विरोधात निवासी डॉक्टरांनी आणि स्थानिकांनी मोर्चा काढला आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने आंदोलकांनी आमच्या बहिणीला न्याय द्या' अशी मागणी केली आहे. या आंदोलनाला जनतेचाही पाठिंबा मिळत आहे.
#WATCH | Doctors and locals from Mumbai hold protest at Azad Maidan to protest against Kolkata doctor rape and murder pic.twitter.com/Kc6bNuEg9h
— ANI (@ANI) August 19, 2024
रविवारी झालेल्या सायन रुग्णालयातील घटनेमुळे मुंबईत आणखी परिस्थिती चिघळली. रुग्णावर उपचार करताना नातेवाईकांनी डॉक्टरचा छळ केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रुग्ण आणि दोन महिलांसह तीन पुरुषांविरुध्दात गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी पोलिसांनी प्रसाद मरियप्पन देवेंद्र (31) आणि त्याची बहीण शेवता मरियप्पन देवेंद्र (28) यांना ताब्यात घेतले होते.
गेल्या अनेक दिवसांपासून हॉस्पिटलमधील डॉक्टरांवर होणाऱ्या अत्याचार घटना वाढल्या आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उभे केले आहे. तरी एकीकडे भितीचे वातावरण पसरले आहे. डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणात दिल्लीत देखील आंदोलने सुरु आहे. न्याय मिळे पर्यंत असंच आंदोलन सुरु ठेवू असा दावा केला आहे.