पुण्यामध्ये आज मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. अशामध्ये सखल भागात राहणार्या आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यांनी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी सध्या जलसंपदा विभाग सोबत समन्वय साधून असल्याची माहिती देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासाकरिता पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट दिला आहे. Pune Rains: पुणेकरांनो सावधान! घाटांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, आज आणि उद्या प्रवास टाळण्याचा सल्ला .
पुण्यात पावसाला जोर
प्रचंड पावसामुळे खडकवासला धरणातून 2000 क्युसेक इतका विसर्ग अर्ध्या तासापासून सुरू करण्यात आला असून महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी अशा सर्व यंत्रणांशी जलसंपदा विभाग यासाठी समन्वय ठेवून आहेत. स्थानिक प्रशासन सुद्धा योग्य खबरदारी घेत आहेत.#Maharashtra#Pune#MonsoonAlert
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 19, 2025
🛑🛑 महत्वाची सूचना🛑🛑#खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून #मुठानदी पात्रामध्ये सायंकाळी ६ वाजता ४ हजार ३४५ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी- श्वेता कुऱ्हाडे,संनियंत्रण अधिकारी, मध्यवर्ती नियंत्रण कक्ष पुणे#Punerain#REDALERT pic.twitter.com/PXXT362scn
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) June 19, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)