आषाढी वारी 2025 ला सुरूवात झाली आहे. आज ज्ञानोबांची पालखी आळंदी मधून प्रस्थान करणार आहे. उद्या 20 जून दिवशी पुण्यात संत तुकाराम आणि ज्ञानोबांची पालखी एकत्र येणार आहे. हा सोहळा पाहण्यासाठी पुण्यात भाविकांची तोबा गर्दी असते. सुमारे 3-4 लाख भाविक या निमित्ताने पुण्यात असल्याने वाहतूकीमध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. दरम्यान यंदा वारीतील गर्दीच्या नियंत्रणासाठी एआय चा वापर केला जात आहे, अशात भाविकांना पुण्यातील वारीचं लाईव्ह ट्रॅकिंग पाहता येणार आहे. diversion.punepolice.gov.in वर उद्या पुण्यात पालख्या आल्यानंतर अपडेट्स पाहता येणार आहेत. त्यानुसार नागरिकांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यात पालख्यांंचे लाईव्ह ट्रॅकिंग कुठे पहाल?
उद्या दि. २० जून रोजी संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुणे शहरात दाखल होणार आहेत.
त्याअनुषंगाने पुणे शहरातील वाहतुकीत विविध बदल करण्यात आले आहेत.
नागरिकांना आता पालखीचे लाईव्ह ट्रॅकिंग https://t.co/8tyOBuO6vv येथे करता येईल.#Wari2025@CPPuneCity pic.twitter.com/DPo9jxUmTA
— पुणे शहर वाहतूक पोलीस (@PuneCityTraffic) June 19, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)