Supriya Sule Bags Inspected By EC Officials (फोटो सौजन्य - ANI)

Supriya Sule Bags Inspected By EC Officials: सोलापुरात निवडणूक रॅलीदरम्यान रविवारी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बॅगची तपासणी केली होती. त्यानंतर आज पुण्यातील मांजरी, हडपसर येथील हेलिपॅडवर निवडणूक अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी-एससीपीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या बॅगची तपासणी केली. त्याआधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगचीही ठाण्यात तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना जबाब विचारला होता.

याचदरम्यान, शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा आणि त्यांची नात रेवती सुळे या एमआयडीसी परिसरातील बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या गेटबाहेर भेट आणि खरेदीसाठी गेल्या होत्या. यावेळी प्रतिभा पवार आणि रेवती सुळे या दोघींनाही प्रवेश नाकारण्यात आला. आत प्रवेश मिळण्याआधी त्यांना सुमारे अर्धा तास प्रतीक्षा करावी लागली. (हेही वाचा -Sharad Pawar’s Bag Checked: निवडणूक अधिकाऱ्यांकडून शरद पवार यांच्या सामानाची तपासणी, प्रतिभा पवार यांना टेक्सटाईल पार्कच्या बाहेर थांबवले (Watch Video))

भारतीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर आणि बॅग तपासल्याचा निषेध करत सुप्रिया सुळे यांनी याला ‘घाणेरडे राजकारण’ असे म्हटले होते. उद्धव ठाकरेंच्या बॅगांची दोनदा तपासणी झाली, तर सत्तेत असलेल्या राजकारण्यांच्या बॅगा अशा प्रकारे तपासल्या जात नाहीत, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. (Ajit Pawar's Bag Checked: अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या; निवडणूक अधिकाऱ्यांना काय सापडले? सर्वत्र मिष्कील चर्चा)

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून सुप्रिया सुळेंच्या बॅगेची तपासणी - 

मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सुळे म्हणाल्या की, फक्त विरोधी पक्षनेत्यांच्या बॅगा तपासल्या जातात हे कसं शक्य आहे? उद्धव ठाकरेंच्या बॅगा दोन वेळा तपासल्या गेल्या. सत्तेत असलेल्या नेत्यांची चेकिंग होत नाही. महाराष्ट्रात असे घाणेरडे राजकारण केले जात आहे.