Sharad Pawar’s Bag Checked: ईसीआय अधिकाऱ्यांच्या पथकाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सामानाची आणि हेलिकॉप्टरची कसून तपासणी केली. शरद पवार आज दुपारी रॅलीसाठी सोलापूरला जात असताना, त्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. सामानाच्या तपासणीवेळी त्यांच्यासोबत असलेल्या पत्नी प्रतिभा पवार (Pratibha Pawar) आणि नात रेवती सुळे यांना बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या गेटबाहेर थांबवण्यात आले. तब्बल अर्धा तास शरद पवार यांच्या सामानाची तपासनी करण्यात आली. 2008 मध्ये शरद पवार यांच्या प्रयत्नातून टेक्सटाईल पार्कची उभारणी करण्यात आली होती. ज्यामुळे तेथे व्यवसाय आणि रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या होत्या. (Ajit Pawar's Bag Checked: अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या; निवडणूक अधिकाऱ्यांना काय सापडले? सर्वत्र मिष्कील चर्चा)

निवडणूक अधिकाऱ्यांकडून शरद पवार यांच्या सामानाची तपासणी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)