मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी घेतले 'हे' महत्वाचे निर्णय; सहा मंत्र्यांसह पार पडली पहिली कॅबिनेट बैठक
उद्धव ठाकरे कॅबिनेट बैठक (संग्रहित संपादित प्रतिमा)

अखेर शिवसेनेचे स्वप्न सत्यात उतरले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासह महाविकास आघाडीच्या सहा नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. नुकताच शिवतीर्थावर हा शपथ विधी सोहळा पार पडला, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या कुटुंबासह सिद्धिविनायकाचे दर्शन घेते. शपथविधी पार पडल्यावर नव्या सरकारची पहिली कॅबिनेट बैठक (Cabinet Meeting) पार पडली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहा मंत्र्यांचा समावश होता. साधारण दीड तास ही बैठक चालली. या बैठकीमध्ये नक्की काय बोलणी झाली, कोणत्या विषयाला हात घेतला गेला याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.

आज पार पडलेल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीमध्ये रायगड जिल्ह्यासाठी मदत जाहीर करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्याच्या संवर्धनाचे काम चालू आहे, त्यासाठी 606 कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले होते. या बैठकीमध्ये त्याच्या पुढील कामांसाठी 20 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत करण्याची इच्छा नाही, त्यामुळे राज्यात अवकाळी पावसामुळे किती नुकसान झाले आहे याची माहिती मागवण्यात आली आहे. त्यानंतर नव्या सरकार कडून शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्यात येईल असाहे निर्णय घेतला गेला.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत राज्य सरकार आणि केंद्र सरकारने किती मदत जाहीर केली याची माहिती मी मागवली आहे. त्यानंतर त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. मी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत व आतापर्यंत फक्त दलास दिला होता मात्र आता शेतकऱ्यांचे समाधान होईल अशी मदत केली जाईल. आता महाराष्ट्राला एक नंबरचे राज्य बनवण्यासाठी आपण सर्वजन प्रयत्न करू, यासाठी आम्हाला तुमचे सहकार्य हवे आहे.' अशाप्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिली पत्रकार परिषद पार पडली. (हेही वाचा: आज बाळासाहेब असते तर असे घडले नसते; उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर #SorryBalasaheb हॅशटॅग ट्रेंड)

या पहिल्या कॅबिनेट बैठकीसाठी उद्धव ठाकरे यांच्यासह  शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे व सुभाष देसाई, राष्ट्रवादी कॉंग्रेचे दिग्गज नेते जयंत पाटील व छगन भुजबळ आणि कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात व नितीन राऊत आणि आदित्य ठाकरे हे देहील उपस्थित होते.