आज बाळासाहेब असते तर असे घडले नसते; उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर #SorryBalasaheb हॅशटॅग ट्रेंड
उद्धव ठाकरेंचे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला (संग्रहित संपादित प्रतिमा)

अखेर शिवसेनेचे स्वप्न सत्यात उतरले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासह महाविकास आघाडीच्या तीन नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. नुकताच शिवतीर्थावर हा भव्य शपथ विधी सोहळा पार पडला, त्यानंतर चहूबाजूंनी उद्धव ठाकरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तर दुसरीकडे ट्वीटरवर #SorryBalasaheb हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. स्थापन करण्यासाठी शिवसनेने भाजपला डावलून कॉंग्रेसशी हातमिळवणी केली ही गोष्ट अनेकांना रुचली नाही.

पहा लोकांनी केलेले ट्वीट -

भाजपसोबतची युती तुटल्यावर सत्ता स्थापन कारणासाठी शिवसेनेला महाआघाडीशी हातमिळवणी करावी लागली. त्यानंतर आजच्या सोहळ्यात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र आज जर का बाळासाहेब जिवंत असते तर त्यांनी हे घडू दिले नसते असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. फक्त स्वार्थासाठी, सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्या विरुद्ध विचारांच्या लोकांशी युती केली हे अनेकांना रुचले नाही. त्यामुळेच सध्या #SorryBalasaheb हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. (हेही वाचा: मुख्यमंत्री म्हणून नावाची घोषणा झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचे मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला वंदन)

दरम्यान, शिवतीर्थावर नुकताच हा सोहळा पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे व सुभाष देसाई, राष्ट्रवादी कॉंग्रेचे दिग्गज नेते जयंत पाटील व छगन भुजबळ आणि कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात व नितीन राऊत यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.  त्यानंतर आता उद्धव ठाकरे सिद्धिविनायकाचे दर्शन घेतील व त्यानंतर कॅबिनेटची पहिली बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्य शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.