महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: अभिजित बिचुकले देणार आदित्य ठाकरे  यांना आव्हान; वरळी विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून भरणार उमेदवारी अर्ज
Aaditya Thackeray Vs Abhijit Bichukale (Photo Credits: Facebook)

बिग बॉस मराठी 2 फेम अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale) यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक लढवणार असल्याची माहिती दिली होती. आज LatestLY Marathi शी बोलताना त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूकीच्या मैदानात उतरणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आज मुंबईत ते अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघातून काल शिवसेनेच्या आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे यंदा हाय प्रोफाईल झालेल्या या मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे विरूद्ध अभिजित बिचुकले अशी टक्कर होणार आहे. अद्याप वरळीमधून मनसे आणि आघाडीने उमेदवार दिलेला नाही.  Exclusive: Bigg Boss Marathi 2 फेम अभिजीत बिचुकले ठरणार का उदयनराजेंसाठी डोकेदुखी?

काही दिवसांपूर्वी अभिजीत बिचुकले सातारामधून भाजपामध्ये दाखल झालेल्या उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लोकसभा पोटनिवडणूक लढणार असल्याचीही चर्चा रंगली होती. मात्र आज बिचुकले यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 ला सामोरं जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळी विधानसभा मतदार संघ का निवडला?

महाराष्ट्रात 288 विधानसभा जागांवर 21 ऑक्टोबरला मतदान आणि 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. यंदा शिवसेनेकडून आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आदित्यच्या माध्यमातून पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती निवडणूक लढणार असल्याने ही निवडणूक शिवसेना सोबतच ठाकरे परिवारासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.