शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी बुधवारी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांची भेट घेतली. या वेळी पक्षाचे नेते अनिल देसाई आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी यासुद्धा त्यांच्यासोबत होत्या. या भेटीनंतर तेजस्वी यादव आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी संयुक्तरित्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मात्र, दोन्ही नेत्यांनी (Aaditya Thackeray Meets Tejashwi Yadav) बैठकीत झालेल्या चर्चेचा तपशील उघड करणे कटाक्षाने टाळले.
तेजस्वी यादव यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, या भेटीमध्ये कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही. सध्या तेजस्वी यादव चांगले काम करत आहेत. पाठिमागील प्रदीर्घ काळापासून त्यांचा आणि आमचा संवाद होता. आज प्रत्यक्ष भेट झाली. या भेटीत मी त्यांना महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रण दिले आहे. नक्कीच ते महाराष्ट्रात येतील. दरम्यान, देशातील लोकशाही वाचविण्यासाठी सर्व युवा नेतृत्व पुढे येत असल्याचेही आदित्य ठाकरे या वेळी म्हणाले. (हेही वाचा, Aditya Thackeray: शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी घेतली बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांसह उपमुख्यमंत्री तेजस्वी यांची भेट)
ट्विट
Bihar | Shiv Sena (Uddhav Thackeray) leader Aditya Thackeray & party MP Priyanka Chaturvedi meet Bihar Deputy CM Tejashwi Yadav at Rabri Devi's residence in Patna. pic.twitter.com/OAnlZghtZ0
— ANI (@ANI) November 23, 2022
तेजस्वी यादव यांनीही आदित्य ठाकरे यांच्या प्रतिक्रियेचा धागा पकडत म्हटले की, ही उत्स्फूर्त भेट होती. या भेटीत कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही. मात्र, सध्या देशात लोकशाही धोक्यात आहे. लोकशाही वाचविण्याचे आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे. त्यामळे देशातील युवा लोक पुढे येत असल्याचेही तेजस्वी यादव यांनी या वेळी म्हणाले.
ट्विट
तेजस्वी यादव से मिलने पटना पहुँचे आदित्य ठाकरे.. pic.twitter.com/wFYARdlZTN
— Nitish chandra (@NitishIndiatv) November 23, 2022
दरम्यान, बिहार दौऱ्यावर जाण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज्य मंत्रिमंडळाची आज पार पडणारी बैठक रद्द झाली. त्यावरुन राज्य सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मंत्रिमंडळ गुजरात विधानसभा निवडणुकीत व्यग्र आहेत. गुजरात निवडणुकीसाठी आजची मंत्रीमंडळ बैठक रद्द करण्यात आली. त्यांचे प्रेम राज्यावर नाहीच. आगोदर आमदार पाठवले, मग प्रकल्प आणि आता मंत्रिमंडळच गुजरातला पाठवले, अशा शब्दात आदित्य यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे आज बिहार दौऱ्यावर जाण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.