
Kolhapur Girl Dies by Suicide: गेल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर झाला. यात अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं. परंतु, आता कोल्हापूरमधून (Kolhapur) अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील कोनोली तिरफ असंदोली (Asandoli) जवळील कुपलेवाडी येथे 18 वर्षीय विद्यार्थिनीने बारावीला कमी मार्क्स पडल्याने आत्महत्या (Suicide) केली. साधना पांडुरंग टिंगे असं या विद्यार्थीनीचे नाव आहे. कोनोली तिरफ असंदोलीच्या सरपंच वृषाली पांडुरंग टिंगे यांची मुलगी साधना ही गुरुवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास तिच्या घरात छताच्या तुळईला गळ्यात स्कार्फ बांधून लटकलेल्या अवस्थेत आढळली.
प्राप्त माहितीनुसार, साधना ही पन्हाळा तालुक्यातील पनोर येथील एका महाविद्यालयात 12 वीच्या विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती. तिने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत साधनाला 48 टक्के गुण मिळाले होते. निकाल अपेक्षेपेक्षा कमी लागल्याने साधना काही दिवसांपासून नैराश्यात होती. (हेही वाचा -Man Suicide Due to Stock Market Loses: शेअर बाजारात 16 लाख रुपयांचे नुकसान; नाशिकमधील 28 वर्षीय तरुणाची आत्महत्या)
दरम्यान, गुरुवारी साधना घरी एकटीच होती. त्यानंतर तिने घरात गळफास घेऊन टोकाचे पाऊल उचलले. रात्री उशिरा राधानगरी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक संतोष गोरे सध्या पुढील तपास करत आहेत. साधनाच्या पश्चात तिचे आजी-आजोबा, आई-वडील, भाऊ आणि काका आहेत. (हेही वाचा - Manav Sharma Suicide Case: आग्र्यात पत्नीच्या छळाला कंटाळून IT कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; मृत्यूपूर्वी लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्ड करून सांगितली व्यथा)
तथापि, साधनाची आई कोनोली टार्फ असंडोलीची सरपंच आहे. विशेष म्हणजे, तिचे तीन जवळचे नातेवाईक दोन चुलत भाऊ आणि एका चुलत भावाचा पती पोलिस दलात सेवा करत आहेत. कुटुंबातील सदस्य सुशिक्षित असताना साधनाचे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य हेल्पलाइन क्रमांक:
टेली मानस (आरोग्य मंत्रालय): 14416 किंवा 1800 891 4416; निमहंस: + ९१ + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; पीक माइंड: 080-456 87786; वांद्रेवाला फाउंडेशन: – 9999 666 555; अर्पिता आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाइन: 080-23655557; आयकॉल: 022-25521111 आणि 9152987821 आणि 9152987821; सीओओजे मेंटल हेल्थ फाउंडेशन (सीओओजे): 0832-2252525.