
दोन मुलींसह एका महिलेने पंचगंगानदीत (Panchganga River) उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक माहिती उघडकीस आली आहे. ही घटना कोल्हापूरच्या (Kolhapur) करवीर तालुक्यातील (Karvir) वडणगे (Vadange) येथे घडली आहे. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण कोल्हापूर हादरून गेले आहे. पाच वर्षापूर्वी मृत महिलेच्या पतीचा मृत्यू झाला असून त्या उदरनिर्वाहासाठी कोल्हापुरातील एका ज्वेलर्समध्ये सेल्समन म्हणून काम करत असल्याची माहिती मिळत आहे. या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून करवीर पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
सुनेत्रा संतोष सावळकर (वय, 35), श्रीशा (वय, 12) आणि सम्राज्ञी (वय, 7) अशी मृतांची नावे आहेत. सुनेत्रा या मूळच्या बार्शी येथील असून तेरावर्षांपूर्वी त्यांचा संतोष सावळकर या नावाच्या व्यक्तीशी विवाह झाला होता. मात्र, गेल्या पाच वर्षांपूर्वी संतोष यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर संपूर्ण कुटुंबियाची जबाबदारी सुनेत्रा यांच्या खांद्यावर आली. त्या कोल्हापुरातील एका ज्वेलर्सच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करीत होत्या. दरम्यान, सुनेत्रा या शनिवारी आपल्या दोन मुलींसह कोल्हापुरात गेल्या होत्या. मात्र, रात्री उशीर होऊनही त्या घरी परतल्या नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर रविवारी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास पंचगंगेत एका महिलेसह दोन मुलींचा मृतदेह तरंगताना ग्रामस्थानी पाहिल्यानंतर पोलिसांना कळवले. त्यानंतर मृत महिलेच्या पर्समध्ये सापडेलल्या ओळखपत्रातून हे मृतदेह सुनेत्रा आणि त्यांच्या दोन मुलींचेच असल्याची पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी सुनेत्रा यांच्या नातेवाईकांना फोन करून याबाबत कळवण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे. हे देखील वाचा- Kolhapur: इचलकरंजी येथील भाजप नगरसेविका नेहा हुक्किरे यांचे पती विनायक हुक्किरे यांच्यावर प्राणघातक हल्ला